डॉक्टर, वैद्यकीय सेवांचे होणार डिजिटायझेशन; नोंदणीला सुरुवात

नवी दिल्ली – ‘आयुष्मान भारत डिजिटल आरोग्य मिशन’अंतर्गत देशातील सर्व वैद्यकीय सुविधा आणि डॉक्टरांचे डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गंत देशभरातील डॉक्टर आणि उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधा यांची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. यासंदर्भात देशातील सर्व सरकारी रुग्णालये आणि संबंधित सरकारी विभागाला पत्र लिहिण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे. डिजिटायझेशन प्रक्रियेला २७ सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले होते. याअंतर्गत केंद्र सरकारकडून एबीडीएचएम नावाचे वेब पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या वेबपोर्टलवर जाऊन आपल्या रुग्णालयात उपलब्ध असणाऱ्या आरोग्य सुविधांची नोंद करण्याचे आवाहन खासगी क्षेत्रातील डॉक्टरांना करण्यात आले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …