सिडनी – इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामधील अॅशेस मालिकेसाठी सामनाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेले ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू डेव्हिड बून यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे उभय संघांमधील ५ जानेवारी २०२२ पासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीला ते मुकणार आहेत. बून यांना कोरोनाबाबतची कोणतीही लक्षणे नसली तरी त्यांनी आवश्यक ते लसीचे डोस घेतलेले आहेत. यामध्ये बुस्टर डोसचाही समावेश आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामधील पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्याला १४ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. त्या सामन्यापर्यंत बून तंदुरुस्त होतील, अशी आशा बाळगण्यात येत आहे. आयसीसी पंचांच्या यादीतील स्टिव बर्नार्ड चौथ्या कसोटीत सामनाधिकाऱ्याची भूमिका बजावतील. बून हे मेलबर्न येथेच दहा दिवस विलगीकरणात राहतील. या आधी इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड यांनाही कोरोना झाल्यामुळे विलगीकरणात पाठवण्यात आले होते.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …