डेविस चषक : जोकोविचच्या जोरावर सर्बियाने ऑस्ट्रियाला नमवले

इंसब्रक (ऑस्ट्रिया) – अव्वल क्रमांकावरील नोवाक जोकोविचने डेविस चषक फायनल्समध्ये सर्बियाला विजय मिळवून दिला, तर ४० वर्षीय फेलिसियानो लोपोजने गतविजेता स्पेनचा शानदार सुरुवात करून दिली व युवा इटालियन संघाने ३२ वेळचा चॅम्पियन अमेरिकेचा पराभव केला. जोकोविचने डेनिस नोवाकला ६-३, ६-२ असे मात देत सर्बियाला यजमान ऑस्ट्रियावर २-० ने आघाडी मिळवून दिली, तसेच दुसान लाजोविचने गेराल्ड मेल्जरला तीन सेटमध्ये पराभूत केले. डेविस चषक एकेरी सामन्यात जोकोविचची विजयी मोहीम १५ सामन्यांची झाली. दुसरीकडे माद्रिदला ग्रुप ‘ए’ च्या सामन्यात स्पेनच्या इक्वाडोरवर आघाडी मिळवून दिली, तर लोपेजने रॉबर्टो किरोजवर ६-३, ६-३ असा विजय मिळवला. पाब्लो कारेनो बस्टाने त्यानंतर एमिलियो गोमेजचा पराभव केला. लोपेजला एकेरी सामना यासाठी खेळावा लागला, कारण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर कार्लोस अलकाराज संघातून बाहेर झाला. ग्रुप ‘ई’मध्ये अमेरिकेचा इटलीने पराभव केला. लोरेंजो सोनेगाने रिली ओपेलकाचा ६-३, ७-६ असा, तर जानिक सिनेरने जॉन इसनेरचा ६-२, ६-० असा पराभव केला. दुहेरीत राजीव राम व जॅक सॉकने फॅबियो फोगनिनी व लोरेंजो मुसेतीचा पराभव करत स्कोर २-१ असा केला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …