डेविस चषक : जर्मनीने सर्बियाला नमवले, इटलीचाही विजय

वॉशिंग्टन – जगातील क्रमांक एकचा खेळाडू नोवाक जोकोविच सलग सामने खेळण्यास उतरला, पण त्यानंतर ही त्याचा संघ सर्बियाला डेनिस चषक फायनल्स टेनिस स्पर्धेच्या गट फेरीत येथे जर्मनीकडून पराभवाचा सामना करावा लागला. जेन-लेनार्ड स्ट्रुफचा पराभव करत सर्बियाला १-१ अशी बरोबरी मिळवून दिल्यानंतर लगेचच जोकोविच निकोलस सेसिचसोबत दुहेरी सामन्यात उतरला. टिम पुएट्ज व केविन क्राविट्ज या जोडीने दरम्यान अटीतटीच्या सामन्यात ७-६, ३-६, ७-६ अशा विजयासह जर्मनीला २-१ने विजय मिळवून दिला. सर्बियाला देखील क्वार्टर फायनलमध्ये जागा मिळवू शकते. सहा ग्रुप विजेता व दोन उपविजेत्यांना अंतिम आठमध्ये जागा मिळते. जर्मनी संघ ग्रुप एफमध्ये ऑस्ट्रियाचा पराभव करत क्वार्टर फायनलमध्ये जागा पक्की करू शकतो. ऑस्ट्रियाला सर्बियाने पराभूत केले होते. कोरोना विषाणू निर्बंधामुळे रिकाम्या स्टेडियममध्ये होणाऱ्या सामन्यात डोमिनिक कोफरने फिलिप क्राजिनोविचचा ७-६, ६-४ असा पराभव करत जर्मनीला आघाडी मिळवून दिली, पण जोकोविचने आपल्या ५० व्या डेविस चषक सामन्यात स्ट्रुफचा ६-२, ६-४ असा पराभव करत सर्बियाला बरोबरी मिळवून दिली. छोट्या ब्रेकनंतर जोकोविच दुहेरी सामन्यात उतरला, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. इटली ग्रुप ‘ई’ मध्ये कोलंबियाचा पराभव करत अंतिम आठमध्ये जागा बनवणारा पहिला संघ बनला आहे. इटलीचा लोरेंजो सोनेगोने तुरिनमध्ये निकोलस मेजियाचा ६-७, ६-४, ६-२ असा पराभव केला, तर यानिक सिनरने डॅनियल इलाही गेलेनला ७-५, ६-० असे पराभूत केले. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू दानिल मेदवेदेवच्या उपस्थितीत रशियाने इक्वाडोरचा पराभव केला. मेदवेदेवने एमिलियो गोमेजची सर्व्हिस पाच वेळा तोडत ६-०, ६-२ असा विजय मिळवत रशियाला २-० अशी निर्णायक आघाडी मिळवून दिली. पाचव्या क्रमांकाचा खेळाडू आंद्रे रुबलेवने रॉबर्टो क्विरोजचा ६-३, ४-६, ६-१ असा पराभव करत रशियाला विजयी सुरुवात करून दिली. रुबलेव व अस्लान करात्सेवच्या जोडीने दुहेरी सामन्यात गोंजालो एस्कोबार व डिएगो हिडालगोचा ६-४, ४-६, ६-४ असा पराभव केला. माद्रिदमध्ये खेळवण्यात येणाऱ्या ग्रुप ए मध्ये रशिया व गतविजेता स्पेन क्वार्टर फायनलमध्ये जागा मिळवण्याचा दावेदार आहे. ब्रिटन, ऑस्ट्रेलिया व कजाखिस्तानने देखील विजय मिळवले. ब्रिटनने ग्रुप ‘सी’ मध्ये फ्रान्सचा २-१ असा तर ग्रुप ‘बी’ मध्ये स्वीडनला कजाखिस्तानने २-१ असे नमवले. तसेच ऑस्ट्रेलियाने ग्रुप ‘डी’ मध्ये हंगेरीचा २-१ ने पराभव केला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …