‘ डेंग्यू’चा उद्रेक रोखण्यासाठी केंद्र सरकार ‘या’ नऊ राज्यांमध्ये पाठवणार तज्ज्ञांची टीम

नवी दिल्ली – गेल्या काही आठवड्यांत संपूर्ण भारतात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे लोकांची आणि सरकारचीही चिंता वाढली आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्ये डेंग्यूची साथ जास्त प्रमाणात पसरली आहे. देशभरात गेल्या काही आठवड्यांत एक लाखाहून अधिक डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. सप्टेंबर महिन्यात उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये डेंग्यूच्या साथीला सुरुवात झाली होती. सध्याचा डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तज्ज्ञांची टीम देशभरातील नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आणि नॅशनल वेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्रामचे अधिकारी त्या राज्यांतील आरोग्य अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. ज्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तज्ज्ञांची टीम पाठवण्यात आली आहे, त्यामध्ये हरियाणा, पंजाब, केरळ, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली आणि जम्मू आणि काश्मीर यांचा समावेश आहे. डेंग्यूच्या प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य उपायांसह तांत्रिक मार्गदर्शन केले जाणार आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, यावर्षी जास्त झालेला पाऊस आणि डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अपुरे उपाय या संसर्गाच्या वाढीस कारणीभूत असू शकतात. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिल्लीत एका बैठकीच्या अध्यक्षतेखाली आरोग्य सचिवांना डेंग्यूची जास्ती प्रकरण असलेल्या राज्यांमध्ये तज्ज्ञांचे पथक पाठवण्याचे निर्देश दिले होते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …