डीडीसीए अध्यक्ष बनणार रोहन जेटली, सिद्धार्थ वर्मांकडे सचिवपद

नवी दिल्ली – रोहन जेटली यांनी वरिष्ठ अधिवक्ता विकास सिंह यांच्यावर मोठ्या फरकाने विजय मिळवत दिल्ली व जिल्हा क्रिकेट असोसिएशन (डीडीसीए)चे अध्यक्ष निवडले गेले, तर राज्याचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा यांचे छोटे चिरंजीव व प्रथम श्रेणी क्रिकेटपटू सिद्धार्थ वर्मा यांनी सचिव पद प्राप्त केले.

सिद्धार्थने सचिव पदाच्या निवडणुकीत भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या विनोद तिहाडा यांचा पराभव केला. मतमोजणी गुरुवारी रात्री उशिराने संपन्न झाली. माजी कसोटी क्रिकेटपटू गौतम गंभीरचे मामा पवन गुलाटी डीडीसीएचे नवे खजीनदार असतील. बीसीसीआयचे माजी कार्यवाहक अध्यक्ष सी. के. खन्ना यांची पत्नी शशी खन्ना यांनी आपले उपाध्यक्ष पद कायम राखले. अध्यक्ष पदासाठी जेटली यांना १६५८ तर सिंह यांना ६६२ मते मिळाली. हे दुसऱ्यांदा आहे की, सिंह यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठाल्या फरकाने पराभव पत्कारावा लागला. मागील वेळी वरिष्ठ पत्रकार रजत शर्मा यांच्याकडून पराभव मिळालेला. वर्मा यांनी स्वतंत्र उमेदवाराच्या रूपात तिहाडा यांचा ६१८ मतांनी पराभव केला. वर्मा यांना १३२२ मते, तर तिहाडा यांना ७०४ मते पडली. इतर एक उमेदवार राकेश बंसल देखील सचिव पदाच्या शर्यतीत होते, पण ते २४८ मते मिळवत तिसऱ्या स्थानी राहिले. राकेश हे बीसीसीआयचे माजी उपाध्यक्ष स्नेह बंसल यांचे छोटे भाऊ आहेत. डीडीसीएचे माजी निवडकर्ते व बीसीसीआयच्या उपसमितीचे सदस्या वर्मा वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, माझ्यासाठी वैयक्तिक रूपात मोठा विजय आहे. मला रोहनला आपला पूर्ण पाठिंबा द्यायचा आहे व दिल्ली क्रिकेटसाठी मला चांगले काम करायचे आहे. मी एक क्रिकेटपटू आहे व या खेळासाठी काम करणे माझ्यासाठी प्राथमिकता असेल. असे कळते की, तिहाडा व त्यांच्या समर्थकांनी आपला पराभव दिसताच फिरोजशाह कोटला परिसर सोडण्यास सुरुवात केली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …