ठळक बातम्या

डिसेंबर २००४ ला थायलंड आंतरराष्ट्रीय वाहन मेळाव्यात टोयोटा फॉच्र्युनर प्रथम सादर करण्यात आली.

या गाडीमध्ये बसल्यावर इतर गाडय़ा तुम्हाला अगदीच कस्पटासमान वाटतात. रस्त्यावर ज्या वेळी ही गाडी धावते त्या वेळी आतमध्ये बसलेल्या मालकाला आपसूकच इतरांच्या तुलनेत आपण कोणीतरी वेगळे आहोत असे वाटते. देखणेपणा आणि दमदार इंजिनामुळे ती तिच्या सर्व स्पर्धकांना पुरून उरतेअसं म्हटलं तरी वावगं ठरत नाही.

डिसेंबर २००४ ला थायलंड आंतरराष्ट्रीय वाहन मेळाव्यात टोयोटा फॉच्र्युनर प्रथम सादर करण्यात आली. त्यानंतर २००५ च्या सुरुवातीला सर्वत्र उपलब्ध झालेल्या या एसयूव्हीने आपला दबदबा जगभरात आतापर्यंत कायम ठेवला आहे. काळाच्या ओघात तग धरून राहण्यासाठी त्यामध्ये सातत्याने बदल केले गेले. दिसायला भारदस्त, प्रचंड ताकद, आरामदायीपणा आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घेण्यात आलेली काळजी यामुळे ती लोकप्रिय ठरलेली आहे.

बदलत्या काळाचा विचार करून टोयोटा फॉच्र्युनरने आपल्या अंतर्गत आणि बाह्य स्वरूपामध्ये वारंवार बदल केले आहेत. त्यामधूनच ‘ऑल न्यू फॉच्र्युनर २.८ लिटर इंजिन असलेले मॉडेल जन्माला आले. या नव्याने सादर करण्यात आलेल्या मॉडेलमध्ये अत्याधुनिक यंत्रणा, सुरक्षिततेची पुरेपूर काळजी आणि अधिक दमदार इंजिन देण्यात आले आहे.

बाह्य स्वरूप

टोयोटाने नव्याने सादर केलेल्या गाडीला ‘ऑल न्यू फॉच्र्युनर’ असे नाव दिले. यामधूनच तिच्यामध्ये मोठय़ा प्रमाणात बदल केले असल्याची कल्पना यायला लागते. फॉच्र्युनरची बाह्यरचना अतिशय आकर्षक असून, ती पूर्वीपेक्षा अधिक स्टायलिश आहे. ती बाहेरून अतिशय दणकट आणि ‘कूल’ वाटते. गाडीचा समोरील भाग अधिक आकर्षक असून, ग्रिल अधिक रुंद आहेत. अधिक मोठा बंपर्स, डीआरएलसह अ‍ॅटोमॅटिक बीबीएम एलईडी लाइट्स गाडी इतरांचे लक्ष चटकन वेधून घेते. गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स उत्तम असल्याने ऑफ रोडलाही गाडी अतिशय उत्तमरीत्या आपले काम करते. गाडीची चाकेही अतिशय दणकट असून, त्यांचा आकारही मोठा आहे. त्यामुळे महामार्गावर अथवा ऑफ रोडला गाडीने वेग घतल्यानंतर चाकांची रस्त्यावरील पकड भक्कम होत जाते. गाडीच्या विंडोला क्रोमिअम फिनिश्ड असल्याने एक वेगळाच लुक प्राप्त होतो. गाडीचा मागील दरवाजा अ‍ॅटोमॅटिक आहे. त्यामुळे सामान ठेवताना कोणतीही अडचण येत नाही. तो जॅम होणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. साइड मिरर इलेक्ट्रिकली अ‍ॅडजेस्टेबल देण्यात आले आहेत. गाडीच्या पाठीमागे एलईडी रिअर कॉम्बिनेशन असलेले लॅम्प देण्यात आले असून, अ‍ॅरोफिन्समुळे गाडीला एक वेगळाच उठाव प्राप्त होतो.

फोर व्हील ड्राइव्ह

हे या गाडीचे खास वैशिष्टय़ आहे. ज्या वेळी गाडी एखाद्या खड्डय़ातून, खडबडीत रस्त्यांवरून जात असते तेव्हा या गाडीच्या प्रत्येक चाकाला स्वतंत्र पॉवर सप्लाय होतो. टू व्हील ड्राइव्हमध्ये इतर तीनही चाके चिखलात फिरत राहतात. मात्र फोर व्हील ड्राइव्हमध्ये संबंधित चाकाला होणारा पॉवर सप्लाय थांबवल्याने चाक फिरायचं थांबतं. आणि हा सप्लाय इतर तीन चाकांकडे वळवला जातो. त्यामुळे इतर तीन चाके स्वतंत्रपणे काम करून त्या गाडीला चिखल अथवा खड्डय़ांतून बाहेर काढण्यासाठी मदत करतात.

इंजिन

नवीन फॉच्र्युनर मॉडेलमध्ये २.८ लिटरचे डिझेलचे इंजिन उपलब्ध असून, ६ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच नवीन २.७ लिटर पेट्रोल इंजिनमध्ये नवीन ६ स्पीड ऑटोमॅटिक आणि ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. डिझेल o्रेणीत चार सिलिंडर २७५५ सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. डिझेल इंजिनचा टॉर्क या श्रेणीतील कोणत्याही गाडीपेक्षा जास्त म्हणजे ४२० ते ४५० एनएम आहे. त्यामुळे १६०० ते २४०० आरपीएम एवढी ऊर्जा तयार होते

नव्याने विकसित करण्यात आलेल्या फ्रेम रचनेमुळे अतिशय अडथळ्याच्या रस्त्यांवरही गाडी अतिशय दमदारपणे चालते. गाडीमध्ये सस्पेंशन अधिक असल्याने अतिशय आरामदायक वाटते. तसेच गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स अधिक असल्याने ऑफ रोडला, दगडधोंडय़ांच्या रस्त्यांवरही गाडी आपला दणकटपणा पदोपदी जाणवून देते. गाडीमध्ये नवीन हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल आणि डाउनहिल असिस्ट कंट्रोल प्रणाली आहे. यामुळे ज्या वेळी गाडी अतिशय वेगात चढण अथवा उतरणीच्या रस्त्यावर असेल त्या वेळी गाडीवर आपोआप नियंत्रण राखले जाते. गाडीमध्ये इलोक्ट्रॉनिक ड्राइव्ह कंट्रोलचीही सुविधा देण्यात आल्याने ज्या वेळी रस्ता मोकळा असतो त्या वेळी आपण स्टेअरिंगला हात न लावता अतिशय आरामात गाडी चालवू शकतो. गाडीमध्ये इको, पॉवर आणि ड्राइव्ह मोड देण्यात आला आहे. त्यामुळे आपल्याला ज्या वेगात गाडी चालवायची आहे, त्या वेगासाठी आपण हवा तो पर्याय वापरू शकतो. अशा मोडमुळे गाडीचे इंजिन आपला दमदारपणा दाखवण्यास सिद्ध होते. तसेच गाडीमध्ये नव्याने अ‍ॅक्टिव्ह ट्रॅक्शन कंट्रोल देण्यात आल्याने रस्त्यांच्या वळणांवर गाडीवर नियंत्रण मिळवणे शक्य होते

अंतर्गत रचना

ऑल न्यू फॉच्र्युनरची अंतर्गत रचना अतिशय आरामदायी आहे. मात्र तिसऱ्या रांगेतील आसनांवर थोडे अवघडल्यासारखे वाटते. सॉफ्ट लेदर वापरल्याने आसने अतिशय उबदार आहेत. गाडीमध्ये मागील आसनांवर बसणाऱ्या प्रवाशांसाठीही एस व्होण्ट्स आणि एस कंट्रोल सिस्टीम असून, आवश्यक तेव्हा वातानुकूलित हवा उपलब्ध होते. यातील टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट अतिशय देखणी असून, त्यामध्ये नेव्हिगेशनसह इतर अनेक सुविधा आहेत. दुसऱ्या ओळीतील आसने उघडबंद करता येतात, त्यामुळे आवश्यक असेल तर अधिक सामान नेता येऊ शकते. मागे सामान ठेवण्याची जागा कमी असल्याच्या समस्येवर त्यामुळे थोडीफार मात करता येणे शक्य आहे. केबिनमधील लाइट एलईडी असल्याने डोळय़ांना त्रास जाणवत नाही. गाडीचा आतील रंग गडद तपकिरी रंगाचा असून, त्यामुळे गाडीची शोभा अधिक वाढते. गाडीमध्ये पार्क असिस्ट मॉनिटर आणि रिअर सेन्सर्स असल्याने गाडी पार्क करतानाही अडचण येत नाही

सुरक्षेची पुरेपूर काळजी

गाडी आकाराला मोठी असल्याने त्याच तुलनेत आवश्यक त्या प्रमाणात सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली आहे. त्यासाठी गाडीमध्ये अ‍ॅन्टिलॉक ब्रेकिंग प्रणाली (एबीएस), इलोक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन (ईबीडी) आणि ब्रेक असिस्ट (बीए) प्रणाली देण्यात आली आहे. नजरचुकीने रस्त्यांवर एखादा पादचारी गाडीसमोर आलाच तर त्याला जोराचा आघात होऊन मोठा अपघात होऊ नये म्हणूनही आवश्यक ती प्रणाली यामध्ये देण्यात आली आहे. गाडीमध्ये सात एअरबॅग्ज देण्यात आल्या असून, प्रवासी सुरक्षित राहतीत याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. गाडीमध्ये व्हेईकल स्टॅबिलिटी कंट्रोल (व्हीएससी) देण्यात आला आहे. गाडीमध्ये स्पीड ऑटो लॉक तसेच आपत्कालीन अनलॉक देण्यात आला आहे. पहिल्या रांगेतील चालक आणि दुसऱ्या प्रवाशाला मानेचा त्रास होऊ नये यासाठीही आसनांमध्ये आवश्यक तो बदल करण्यात आला आहे. त्यामुळे नवीन टोयोटाचे ‘ऑल न्यू फॉच्र्युनर’ हे मॉडेल स्पर्धकांच्या तुलनेत सर्व पातळ्यांवर आघाडी घेते, यात शंका नाही.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *