बॉलीवूड अभिनेत्री एव्हलीन शर्मा हिच्या घरी लवकरच बाळाचे आगमन होणार आहे. एव्हलीन ही प्रेग्नंट असून, हे त्यांचे पहिलेच अपत्य आहे. डिलिव्हरीपूर्वीच एव्हलीनला तिच्या घरी मुलगा येणार की मुलगी हे कळाले आहे. तिने या सस्पेन्सवरील पडदा दूर करत चाहत्यांनाही याबाबतची माहिती दिली आहे.
एव्हलीन शर्माने एका वेबसाइटशी बोलताना सांगितले की, तिच्या घरी एक छोटीशी परी येणार आहे. त्याकरिता ती खूप उत्साहित आहे. एव्हलीनने ऑस्ट्रेलियन बेस्ड सर्जन डॉक्टर तुषार भिंडीसोबत विवाह केला आहे. या दोघांनी यावर्षी मेमध्ये विवाह केला होता. एव्हलीन आणि तिचा पती हे एका ब्लाइंड डेट सेटअपवेळी भेटले होते. एव्हलीनने आपल्या प्रेग्नन्सीची घोषणा जुलै २०२१मध्ये केली होती. सध्या ती आपली प्रेग्नन्सी फेज खूप एंजॉय करत आहे. एव्हलीनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तिने २०१२मध्ये फ्रॉम सिडनी विथ लव्ह या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये एंट्री केली होती. त्यानंतर ती नौटंकी साला, ये जवानी हैं दिवानी, यारियां, हिंदी मीडियम अशा अनेक चित्रपटांमध्ये दिसून आली, तर २०१९मध्ये तिने प्रभास बरोबर साहो हा चित्रपट करून टॉलीवूडमध्ये एंट्री केली होती.