डिम्पल कपाडिया आणि पंकज कपूरचा ‘जब खुली किताब’

हिंदी सिनेमातील ज्येष्ठ कलाकार पंकज कपूर आणि डिम्पल कपाडिया हे दोघे पहिल्यांदाच ऑन स्क्रिन एकत्र दिसून येणार असून, या दोघांना एकत्र आणण्याचे काम केले आहे अप्लॉझ एंटरटेन्मेंट आणि शू स्ट्रॅप फिल्म्सने. अप्लॉझ एंटरटेन्मेंटच्या जब खुली किताब या आगामी चित्रपटामध्ये हे दोन्ही कलाकार एका रोमँटिक जोडप्याच्या रूपात दिसून येणार आहेत. हा चित्रपट प्रख्यात अभिनेता आणि लेखक सौरभ शुक्ला यांच्या त्याच नावाने असलेल्या नाटकावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शनही सौरभ शुक्लाच करणार आहेत. चित्रपटात पंकज कपूर आणि डिम्पल कपाडिया यांच्याव्यतिरिक्त अपारशक्ती खुरानाही एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसून येणार आहे. याशिवाय चित्रपटात समीर सोनी आणि नौहीद सायरसीही वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमध्ये दिसून येणार आहेत.
जब खुली किताब ही एक प्रेमकथा आहे, ज्यात ५० वर्षांच्या सहजीवनानंतर एक वयोवृद्ध दाम्पत्य घटस्फोटासाठी अर्ज करताना दिसून येते. हा चित्रपट नात्यातील उणीवा आणि त्याचा कुटुंबावर पडणारा प्रभाव अधोरेखित करतो. या चित्रपटासंदर्भात बोलताना सौरभ शुक्ला म्हणाले, जब खुली किताब माझ्या हृदयाच्या जवळचा चित्रपट आहे. मला खूप आनंद आहे की, पंकज कपूर आणि डिम्पल कपाडिया यांच्यासारखे कलाकार या चित्रपटाचा हिस्सा आहेत. आपण सर्वच म्हणतो कोणत्याही नात्यात पारदर्शकता आणि स्पष्टपणा असायला हवा, परंतु आपल्यापैकी किती लोक आहेत जे आपल्या नात्यातील सत्यतेचा सामना करण्यास तयार आहेत?

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …