अनेक कलाकार आपले कम्फर्ट आणि अटींनुसार काम करतात. विवाह फेम अमृता रावनेही आपल्या करीअरच्या सुरुवातीच्या काळात काही नियम आणि अटी घातल्या होत्या. आपण आपल्या करीअरमध्ये केवळ कौटुंबिक चित्रपटच करुत असा विचार अमृताने केला होता. आता अन्य कलाकारांप्रमाणे अमृताच्या मनातही डिजीटल प्लॅटफॉर्मबद्दल ओढ निर्माण झाली आहे. परंतु या प्लॅटफॉर्मवर काम करण्यासाठी ती एका चांगल्या स्क्रप्टिच्या शोधात आहे.
यासंदर्भात बोलताना अमृता म्हणाली,’ डिजीटल प्लॅटफॉर्मकडून मला खूप साऱ्या ऑफर्स येत आहेत. प्रत्येक दुसऱ्या दिवशी मला कुठली ना कुठली ऑफर येत असते. केवळ काम करायचेय म्हणून मी कोणतीही स्क्रप्टि निवडणार नाही. मला काम करताना मजा आली पाहिजे. माझी अटही असते की वेब सीरीज ही अतिशय क्लीन आणि कौटुंबिक असायला हवी. हे संतुलन माझ्याकरिता कायमच गरजेचे ठरणार आहे. अडचण तेव्हा येते जेव्हा मोठमोठ्या बॅनर्सला नकार द्यावा लागतो. अनेकदा मला ईनहाऊस आर्टिस्ट बनण्याचीही संधी चालून आली. परंतु मी नकार दिला. जेव्हा मला टीव्हीवर काम करण्याची ऑफर मिळाली होती तेव्हा मेरी आवाजही पहचान है या शोद्वारे मी डेब्यू केला होता. तेव्हाही माझ्याकडे खूप साऱ्या ऑफर्स आल्या होत्या. परंतु मी स्वत:करिता बेस्ट प्रोजेक्टची प्रतिक्षा केली. असाच शोध डिजीटल प्लॅटफॉर्मच्या कंटेंटसाठीही आहे. या प्लॅटफॉर्मवरही मी जे काही करेन ते खूप खास असेल.
अमृता राव ही बॉलीवूडची प्रख्यात अभिनेत्री असून तिने अब के बरसद्वारे बॉलीवूडमध्ये डेब्यू केले होते. त्यानंतर अमृता इश्क-विश्क, मैं हूं ना, वाह लाईफ हो तो ऐसी , मस्ती सारख्या चित्रपटांमध्ये दिसून आली. परंतु विवाह या चित्रपटाने तिला विशेष लोकप्रियता मिळवून दिली.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …