डिकॉक अखेर गुडघ्यावर बसला, दिला ब्लॅक लाईव्ह मॅटरला पाठिंबा

शारजाह – ब्लॅक लाईव्ह मॅटर्स अभियानात सहभाग नोंदवणार नसल्याने दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डिकॉकला वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातून वगळण्यात आलेले. अशात त्याने आपले मत नोंदवत आपली बाजू मांडलेली. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा त्याची संघात वर्णी लागली. विशेष म्हणजे सामन्यात राष्ट्रगीत झाल्यानंतर डिकॉक ब्लॅक लाईव्ह मॅटर अभियानाला पाठिंबा देताना दिसला. गुडघ्यावर बसून त्याने ब्लॅक लाईव्ह मॅटर अभियानाला पाठिंबा दर्शवला. वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डासोबत क्विंटनचा वाद झाला होता. त्यानंतर संघाकडून कधीच खेळणार नाही, या बातम्याही समोर आल्या होत्या. हा वाद पेटल्यानंतर डिकॉकने दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली. त्यानंतर त्याचे संघात पुनरागमन झाले आहे. क्लास्सेनच्या जागेवर त्याची प्लेईंग इलेव्हनमध्ये वर्णी लागली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …