बिग बॉस ओटीटी स्पर्धक आणि छोट्या पडद्यावरील प्रख्यात अभिनेत्री ऊर्फी जावेद आपल्या अभिनयाव्यतिरिक्त बोल्ड अंदाजासाठीही ओळखली जाते. ऊर्फी जावेद आपल्या ग्लॅमरस फोटोंमुळे खूप चर्चेत आहे. तिच्या चाहत्यांना तिचा हा अंदाज नेहमीच पसंत पडला आहे, परंतु यावेळेस ऊर्फीवर ड्रेस कॉपी केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, केंडल जेनर ११ नोव्हेंबर रोजी सोशल मीडिया स्टार लॉरेन पेरेजच्या विवाहात पोहोचली होती. त्या विवाह सोहळ्यात तिने डायमंड कट ब्लॅक ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमधील केंडलच्या बोल्ड अंदाजाची चांगलीच चर्चा झाली होती. आता सोशल मीडियावर केंडल जेनर आणि ऊर्फी जावेद यांचा एकाच ड्रेसमधील फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. अनेक सोशल मीडिया युजर्स ऊर्फी जावेदवर केंडलचा ड्रेस कॉपी करण्याचा आरोप करत असून तिला ट्रोल करत आहेत.