पर्थ – भारताची टी-२० कर्णधार हरमनप्रीत कौर व अष्टपैलू दीप्ती शर्मा रविवारी येथे महिला बिग बॅश लीग (डब्ल्यूबीबीएल)मध्ये आपापल्या संघाच्या विजयात शानदार कामगिरी करताना प्लेअर ऑफ द मॅच बनल्या. हरमनप्रीतने आपल्या ऑफ स्पिनने दोन विकेट घेतल्यानंतर ४६ चेंडूंत नाबाद ७३ धावा केल्या, ज्यामुळे मेलबर्न रेनेगेड्सने येथे एडिलेड स्ट्राइकर्सचा सहा विकेटनं पराभव केला. मागील १२ महिन्यांत फिटनेस व फॉर्मबाबत झुंजणाऱ्या हरमनप्रीतने डब्ल्यूबीबीएलमध्ये प्रभावी कामगिरी केली. भारतीय फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जने देखील रेनेगेड्सच्या वतीने १६ चेंडूंत २७ धावा केल्या. लॉनसेस्टनमध्ये होबार्ट हरिकेन्सवर सिडनी थंडरच्या ३७ धावांच्या विजयात दीप्तीने चमकदार कामगिरी केली. दीप्तीने १५ चेंडूंत २० धावा केल्या, तर चार षटकांत १३ धावा देत तीन विकेट मिळवल्या. सिडनी थंडरसाठी भारताची सलामी फलंदाज स्मृती मंधानाने देखील ५० चेंडूंत ५० धावा केल्या. हरिकेन्सच्या वतीने रिचा घोष फक्त तीन धावा करू शकली. पर्थ स्कोरचर्स व सिडनी सिक्सर्स यांच्यातील सामन्यात शेफाली वर्मा आठ धावा करत बाद झाली.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …