मेलबर्न – सलामी फलंदाज स्मृती मंधानाच्या मते, सध्याच्या महिला बिग बॅश लीग (डब्ल्यूबीबीएल)मध्ये खेळल्यामुळे भारतीय खेळाडूंना खासकरून पुढील वर्षी होणाऱ्या वनडे विश्वचषकाआधी लयात येण्यास मदत मिळेल. मंधाना त्या आठ भारतीय खेळाडूंत समाविष्ट आहे, जे या वर्षी डब्ल्यूबीबीएलमध्ये खेळत आहेत. तिने म्हटले की, येथे खेळात काही वेळ देण्याची चांगली संधी मिळाली, कारण भारतात सध्या महिला क्रिकेटमध्ये फ्रँचायजी लीग सुरू झालेली नाही. सिडनी थंडरच्या वतीने खेळणारी मंधाना म्हणाला की, यावेळी आमच्याकडे संधी होती व आम्ही पहिल्यापासून येथे होतो व आम्ही १४ दिवसांचे क्वारंटाइन पूर्ण केले होते. पुन्हा मायदेशी परतत येथे काही क्रिकेट खेळणं आम्हाला योग्य वाटले. आम्हाला पुढे विश्वचषक खेळायचा आहे व आमच्या देशात अद्याप डब्ल्यूबीबीएलसारख्या स्पर्धेचं आयोजन होत नाही, त्यामुळे आम्हाला त्याचा फायदा मिळेल. भारताच्या वतीने खेळताना या आठ खेळाडूंचे येथील अनुभव खूप महत्त्वाचे राहिल. मंधानाशिवाय शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिगेज, पूनम यादव, राधा यादव, ऋचा घोष, हरमनप्रीत कौर व दीप्ती शर्मा डब्ल्यूबीबीबीएलमध्ये खेळत आहेत.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …