ठाण्यात आढळला लखोबा

  •  तब्बल २६ महिलांची फसवणूक
  • अडीच कोटींवर टाकला डल्ला

ठाणे – कोरोनाच्या काळानंतर सायबर क्राईममध्ये झपाट्याने वाढ होत असून, अनेक क्लृप्त्या वापरत अनेकांची आर्थिक फसवणूक करण्यात येत आहे. असाच एक लखोबा, जो देशातील वेगवेगळ्या शहरातील महिलांना आमिष देत फसवणूक करत होता, ज्याला ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. पराजित जोगिश के. जे. ऊर्फ पराजिय तयल खलिद ऊर्फ प्रजीत टी. के. (४४) असे आरोपीचे नाव असून तो ताईल हाऊस, ओडतिनगम माही, जि. पाँडिचेरी येथील रहिवासी आहे. त्याच्या विरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता.

आरोपी पराजित जोगिश के. जे. हा या महिलांना पॅरिसमध्ये हॉटेल आहे, आरबीआय बँकेत पैसे अडकले आहेत असे सांगायचा. महिलांशी गोड बोलून त्यांच्याशी जवळीक साधून क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे महागड्या वस्तू खरेदी करीत होता. याबाबत कुठलाही पुरावा मागे सोडत नव्हता. त्यामुळे तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरायचा. असे प्रकार करत त्याने मुंबई, केरळ, बंगळुरू, कलकत्ता अशा विविध ठिकाणच्या २६ महिलांची २ कोटी ५८ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या रकमेचा आकडा जास्त असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तांत्रिक तपास करत पोलिसांनी त्याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तो महिलांना दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून, वेळप्रसंगी लग्नाचे आमिषही द्यायचा. या गुन्ह्यात आणखी दोनजण आरोपी असल्याचे बोलले जात आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …