ठळक बातम्या

ठाण्यातील शिकाऊ विद्यार्थी डॉक्टरची यवतमाळमध्ये हत्या

यवतमाळ – येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकाऊ विद्यार्थी डॉक्टरची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. डॉ. अशोक पाल असे मृत डॉक्टरचे नाव असून, तो एमबीबीएसच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता. महाविद्यालयाबाहेरील तरुणांनी आधीच्या वादातून बुधवारी रात्री ही हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. जन्माष्टमी कार्यक्रमाच्या निमित्ताने काही बाहेरच्या तरुणांनी महाविद्यालयाच्या परिसरात प्रवेश केला आणि त्यांनी मुलींच्या हॉस्टेलसमोर लघुशंका केली होती. त्यावेळी डॉ. अशोक पाल आणि त्यांच्या मित्रांनी त्या तरुणांना हटकले. याच प्रकरणातून डॉ. अशोक यांची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी आतापर्यंत दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृत डॉ. अशोक पाल हे मूळचे ठाणे जिल्ह्यातील रहिवासी होते.
शासकीय महाविद्यालयातील एका डॉक्टर विद्यार्थ्याची हत्या कशी झाली?, बाहेरच्या लोकांना महाविद्यालयाच्या परिसरात प्रवेश कसा मिळतो?, असे प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित करण्यात आले आहेत. शिकाऊ डॉक्टरांनी महाविद्यालयाचे प्रवेशद्वार बंद केले. संतप्त विद्यार्थ्यांकडून महाविद्यालय परिसरात घोषणाबाजीही करण्यात आली. डॉ. अशोक पाल यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याची भूमिका घेत मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावले. त्यामुळे या ठिकाणची आरोग्य यंत्रणा कोलमडली असून, कुणालाही महाविद्यालय परिसरात प्रवेश मिळाला नाही. या आंदोलनामुळे रुग्णांना रुग्णालयाच्या बाहेरच ताटकळत थांबावे लागल्याचे चित्र होते. या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करावी, तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शिकाऊ आंदोलक डॉक्टरांनी केली आहे. आंदोलक विद्यार्थ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यवतमाळ यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून या घटनेचा निषेध केला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …