ठाण्यातील वृद्धाश्रमात ६७ जणांना कोरोना, रुग्णालयात उपचार सुरू

ठाणे – खडवली वृद्धाश्रमातील ६७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांना तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. विशेष म्हणजे, या सर्वांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणही झालेले आहे.
वृद्धाश्रमातील एका कर्मचाऱ्याच्या मुलीला ताप आल्यानंतर त्या कर्मचाऱ्यालाही तापाची कणकण जाणवली. त्यानंतर कोरोनाचा पसार झाल्याचे सांगण्यात येते. एकीकडे रुग्ण संख्या कमी होत असताना, एकाच वेळी ६७ जणांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये एका लहान मुलासह ३९ पुरुष तर एका लहान मुलीसह २८ महिलांचा समावेश आहे. खडीवलीतून हे रुग्ण ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात येणार असल्याची माहिती कळताच रुग्णालय प्रशासनाची चांगली धावपळ उडाली.
ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या संपूर्ण टिमने हे रुग्ण दाखल करण्यासाठीची तयारी केली. कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्याने रुग्णालयातही मोजकेच रुग्ण आहेत. त्यामुळे स्टाफही कमी होता. मात्र, या रुग्णांना आणण्यापूर्वीच तातडीने वॉर्ड ही सज्ज ठेवून डॉक्टर-नर्स तसेच इतर कमर्चारी वर्गास तात्काळ पाचारण करण्यात आले. सध्या या सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …