ठळक बातम्या

 टोकियो पॅरालिम्पिक विजेती भाविना पटेलला एमजी मोटरकडून एसयूव्ही भेट

मुंबई – एमजी मोटर इंडियाने दि वडोदरा मॅरेथॉन यांच्यासोबतच्या सहयोगाने टोकियो पॅरालिम्पिक्स २०२० मधील रौप्य पदक विजेती भाविना पटेल हिला कस्टमाइज्ड एमजी हेक्टर ही एसयूव्ही भेट म्हणून दिली आहे. भारताची पहिली इंटरनेट-कनेक्टेड एसयूव्ही हेक्टर भारतीय पॅरा-ॲथलिटसाठी कस्टमाइज्ड करण्यात आली आहे.
ही एसयूव्ही ॲक्सेलरेटर व ब्रेक्सना ऑपरेट करण्यासाठी हाताने नियंत्रित करता येणारे लिव्हर, असे सेफ्टी फीचर्स, तसेच उत्तमरित्या डिझाइन केलेल्या व्हिलचेअर अटॅचमेंट्ससह शानदार ड्रायव्हिंग एक्स्पीरियन्स देण्यासाठी रिडिझाइन करण्यात आली आहे. या व्हेइकलमध्ये प्रभावी ड्राइव्हसाठी सुपर-स्मार्ट डीसीटी ट्रान्समिशन आणि स्टार्ट/स्टॉप बटन देखील आहे. एमजी मोटर इंडियाचे चीफ टेक्निकल ऑफिसर जयंत देब यांच्या हस्ते भाविना पटेल हिला कस्टमाइज्ड हेक्टर सुपूर्द करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना भाविना पटेल म्हणाली की, मी एमजी मोटर व वडोदरा मॅरेथॉन यांच्या या गेस्चरचे कौतुक करते. मला ही पूर्णत: कस्टमाइज्ड हेक्टर माझ्या मालकीची असण्याचा खूप आनंद होत आहे. मी ड्रायव्हिंग सीटवर बसून या व्हेइकलची क्षमता अनुभवण्यास खूपच उत्सुक आहे. गतीशीलतेसह ही आकर्षक कार मला स्वावलंबीपणा व सक्षमीकरणाची भावना देते.
एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा म्हणाले, एमजीआय विविधता व सर्वसमावेशकतेला प्राधान्य देते आणि ते आमच्या ब्रँड आधारस्तंभांचे भाग देखील आहेत. एमजीमध्ये आम्ही वुमेन्टोरशीप व ड्राइव्ह हर बॅक यांसारख्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून नेहमीच महिलांना प्रोत्साहित करण्यासोबत पाठिंबा देतो. आज आम्हाला टोकियोमध्ये देशाचे नावलौकिक मोठा केलेल्या भाविना हिच्यासाठी आमची एमजी हेक्टर कस्टमाइज्ड करण्याबाबत सन्माननीय वाटत आहे. यासह आम्ही त्यांचे धैर्य व निर्धाराला सलाम करतो. त्यांनी सर्व विषमतेवर मात करीत संपूर्ण देशाला अभिमान वाटावा, अशी कामगिरी केली आहे. महिला सक्षमीकरणाप्रती त्यांचे योगदान अद्वितीय आहे. वडोदरा मॅरेथॉनच्या अध्यक्ष तेजल अमीन म्हणाल्या, आम्ही नेहमीच आमच्या ॲथलिट्सच्या फिटनेस व स्वास्थ्याला प्राधान्य देत आलो आहोत. आमचा ॲथलिट्सचे उत्तम पोषण करण्यावर दृढ विश्वास आहे, ज्यामुळे त्यांना त्यांची ध्येये संपादित करण्यामध्ये मदत होते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …