ह्यूस्टन – भारताच्या जी. साथियानने रशियाच्या व्लादिमीर सिडोरेंकोला ४-० ने पराभूत करून जागतिक टेबल टेनिस विजेतापद स्पर्धेच्या पुरुष एकेरी सामन्याच्या तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. जागतिक क्रमवारीमध्ये ३७ व्या क्रमांकाचा खेळाडू असलेल्या जी. साथियानने १७९ व्या स्थानावरील आपला प्रतिस्पर्धी व्लादिमीर सिडोरेंकोला ११-९, ११-८, ११-६ असे पराभूत केले. त्याचा पुढील मुकाबला जगातील १७ व्या क्रमांकावरील नायजेरियन खेळाडू अरुणा कादरीशी होणार आहे. भारतातील सवार्ेच्च क्रमवारीतील खेळाडू असलेला जी. साथियान आणि जगातील ३० व्या क्रमांकाचा खेळाडू शरत कमल हे दोघे जण मंगळवारी पहिल्या फेरीत हारले होते. मात्र, शरत साथियानसोबत पुरुष दुहेरी आणि अर्चना कामथसोबत मिश्र दुहेरीमध्ये अजूनही आपली छाप सोडू शकतो. शरत आणि अर्चना यांनी अल्जीरियाच्या सामी खेरोफ आणि कातिया केसाकी यांना ३-०ने हरवून अंतिम ३२ मध्ये स्थान मिळविले आहे. साथियान आणि मनिका बत्रा यांना पहिल्या फेरीमध्ये बाय मिळाला आहे आणि त्यांचा पुढील मुकाबला प्यूर्तोरिकोच्या ॲड्रियाना डियाज आणि ब्रायन अफानडोर यांच्याशी होईल. मनिका आणि अर्चना यांना महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत बाय मिळाला आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …
One comment
Pingback: psilocybin chocolate bar for sale