टी-२० सामना : आयर्लंडचा अमेरिकेवर दमदार विजय

फोर्ट लॉडरडेल – लोरकान टकरच्या ५४ चेंडूंतील ८४ धावांच्या मदतीने आयर्लंडने दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात अमेरिकाचा ९ धावांनी पराभव केला. अमेरिकेने पहिल्या सामन्यात आयर्लंडवर २६ धावांनी विजय मिळवलेला. आयर्लंडने १५० धावा केल्या व १९ व्या षटकात एक चेंडू शिल्लक राखताना त्यांचा संपूर्ण संघ गारद झाला. या धावांचा पाठलाग करताना अमेरिकेने २० व्या षटकांत ७ बाद १४१ धावा केल्या. टकरला मॅन आफ द सीरिज म्हणून निवडण्यात आले, ज्याने पहिल्या सामन्यात नाबाद ५७ धावांची खेळी केलेली. आयर्लंडसाठी कुर्टिस कँफरने २५ धावांत ४ विकेट मिळवल्या. दोन्ही संघ रविवारी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात करतील. त्यानंतर आयर्लंड संघ जमैकामध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध तीन वनडे व एक टी-२० सामना खेळेल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …