टी-२० क्रमवारी : राहुलची पाचव्या स्थानी झेप

सूर्यकुमारला २४ स्थानाचा फायदा

दुबई – भारताचा सलामी फलंदाज के. एल. राहुल बुधवारी नव्याने जारी आयसीसी पुरुष टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत एक स्थानच्या सुधारणेसह पाचव्या, तर मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव २४ स्थानांची उंच झेप घेत ५९ व्या स्थानी पोहचला.


पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान देखील एक स्थानच्या सुधारणेसह चौथ्या स्थानी पोहचला आहे. रिझवानने बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यात ९० धावा केल्या, ज्यामुळे क्रमवारीत त्याला फायदा झाला. राहुल रिझवानपासून फक्त सहा रेटिंग गुणांनी पिछाडीवर आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांत ८० धावा केल्या. भारतीय संघाने ही मालिका ३-० अशी जिंकली. न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टीलने भारतविरुद्ध या मालिकेत १५२ धावा केल्या, ज्यामुळे त्याला तीन क्रमांकाचा फायदा झाला व तो १३ व्या स्थानावरून अव्वल दहात पोहचला आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतविरुद्धच्या मालिकेत चार विकेट मिळवणारा मिशेल सँटनर २३ व्या व १३ व्या स्थानी पोहचला. या मालिकेत तीन विकेट घेणारा भुवनेश्वर कुमार पाच स्थानच्या सुधारणेसह १९ व्या स्थानी काबिज झाला. दीपक चाहरला या क्रमवारीत १९ स्थानांचा फायदा झाला. आता तो ४० व्या स्थानी पोहचला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …