टी-२० क्रमवारीत केएल राहुलची घसरण!

मुंबई – टी-२० वर्ल्डकपनंतर पहिल्यांदाच आयसीसीने टी-२० रॅकिंग (क्रमवारी) जाहीर केली आहे. या क्रमवारीचा टी-२० वर्ल्डकपमध्ये धावा करणाऱ्या फलंदाजांना फायदा झाला आहे. मात्र, पहिल्या पाच खेळाडूंमध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही. भारताचा स्टार फलंदाज केएल राहुलची आयसीसी क्रमवारीत घसरण झाली आहे. तो सहाव्या स्थानावर गेला आहे, तर विराट कोहली आठव्या स्थानावर कायम आहे. तर भारतीय टी-२० संघाचा कर्णधार रोहित शर्मा १५ व्या स्थानावरून १६ व्या स्थानावर घसरला आहे.
फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल तीन फलंदाजांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम ८३९ अंकांसह पहिल्या स्थानावर आहे. इंग्लंडचा डेव्हिड मलान दुसऱ्या तर एडन मार्करम तिसऱ्या स्थानावर आहे. टी-२० विश्वचषकात शेवटच्या तीन सामन्यांमध्ये सलग तीन अर्धशतक लगावणाऱ्या राहुलचे ७२७ अंक आहेत. मात्र तो सहाव्या स्थानावर घसरला आहे. विश्वचषकानंतर टी-२०चे कर्णधारपद सोडणारा विराट कोहली ६९८ अंकांसह आठव्या स्थानावर आहे. पहिल्या दहा खेळाडूंमध्ये या दोघांचा समावेश आहे.
न्यूझीलंडचा यष्टिरक्षक फलंदाज डेव्हॉन कॉनवे चौथ्या स्थानावर तर पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान पाचव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा टी-२० कर्णधार ॲरोन फिंच चौथ्या स्थानावरून सातव्या स्थानावर घसरला आहे. दुसरीकडे टॉप-१० मध्ये एकाही भारतीय गोलंदाजाचा समावेश नाही. भारताचा नंबर १ गोलंदाज जसप्रीत बुमराह १५ व्या स्थानावर आहे. गोलंदाजांमध्ये श्रीलंकेचा वनिंदू हसरंगा नंबर एकवर आहे, तर आफ्रिकेचा तबरेज शम्सी दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलियाचा ॲडम झम्पा तिसऱ्या स्थानावर आहे. अष्टपैलू खेळाडंूच्या यादीत अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी एक नंबरवर आहे, तर दुसऱ्या स्थानी बांगलादेशचा शाकीब अल हसन आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतही भारताचा एकही खेळाडू पहिल्या वीस खेळाडूंमध्ये नाही.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …