टीव्ही डिबेट्समध्ये बॉलीवूड कलाकारांना निशाणा बनवणाऱ्यांवर रिचा चढ्ढा भडकली

अभिनेत्री रिचा चढ्ढा ही चित्रपटांव्यतिरिक्त आपल्या बेधडक विधानबाजीसाठीही ओळखली जाते. ती अनेक मुद्यांवर आपले मत मांडताना दिसून येते. आता रिचा पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेचा विषय ठरली आहे. टीव्ही डिबेट्समध्ये बसून जे लोक बॉलीवूड कलाकारांना लक्ष्य बनवत असतात त्यांच्यावर रिचाने टीका केली आहे. रिचाचे म्हणणे आहे की लोक संधीसाधू असतात. त्यांची कोणतीही विश्वसनीयता नसते.

रिचाने अलीकडेच आपला होणारा पती अली फजलबरोबर मिळून एका इंग्रजी वेबसाईटला मुलाखत दिली. या दरम्यान रिचा व अलीने आपल्या खासगी आयुष्याबरोबरच फिल्मी करिअरवरही बरीच चर्चा केली. यावेळी रिचा म्हणाली की, ती अशा लोकांना बिल्कुल गांभीर्याने घेत नाही जे लोक टीव्ही डिबेट्समध्ये विनाकारण बॉलीवूड कलाकारांवर टीका करत असतात. रिचाने म्हटले आहे की, मी अशा लोकांना जराही गांभीर्याने घेत नसते ज्यांची विश्वसनीयता शून्य असते. मला येथे त्यांची नावे घ्यायची नाहीत आणि त्यांना जास्त महत्त्वही द्यायचे नाहीयं. कारण त्यांची कोणती विश्वसनीयता नसते. ते सिस्टममधून रिजेक्ट आहेत. ते तेच आहेत ज्यांना माझी दोस्त मिनी माथुर बॉलीवूडचे खुर्चन म्हणते. जर त्यांना एकत्र जमत असतील तर त्यांनी टीव्ही डिबेटमध्ये दिसावे. त्यांना गांभीर्याने घेता कामा नये. हे त्यापैकी एक आहेत जे एका रुमच्या बाहेर उभे राहतात आणि सहभागी न झाल्यास आपल्यावर भुंकतात.
अलीकडेच रिचाने आपल्या फोनमधून ट्विटर ॲप डिलीट केले आहे. तिने या ॲपचा उल्लेख विषारी ॲप असा केला आहे. ही गोष्ट रिचाने स्वत: सोशल मीडियाद्वारे सांगितली होती.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …