टीम इंडियाविरुद्ध मालिकेसाठी द.आफ्रिकानेकेली संघाची घोषणा

दोन नवख्या चेहऱ्यांना संधी
जोहानिसबर्ग – विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघाविरुद्धच्या मालिकेसाठी यजमान दक्षिण आफ्रिकेने२१ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. संघाचे नेतृत्व डीन एल्गर करणार आहे, तर टेम्बा बाऊमा संघाचा उपकर्णधार असेल. संघामध्येद. आफ्रिकेनेदोन नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. डिओन ऑलिव्हरचेप्रदीर्घकालावधीनंतर संघात पुनरागमन झाले आहे.
२६ डिसेंबर ते १५ जानेवारी २०२२ या कालावधीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाविरुद्ध तीन कसोटी सामन्यांमध्ये खेळेल. बायो बबलमुळे एवढ्या मोठ्या संख्येने खेळाडूंचा बोर्डाकडून संघात समावेश करण्यात आला आहे. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहे. टीम इंडियानेदक्षिण आफ्रिकेत कधीही कसोटी मालिका जिंकलेली नाही.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ३ कसोटी आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. सेंच्युरियन येथेपहिली कसोटी बॉक्सिंग डे (२६ डिोंबरपासून) , दुसरी कसोटी ३ जानेवारीपासून जोहान्सबर्गच्या मैदानावर आणि शेवटची कसोटी केपटाऊन येथे११ जानेवारीपासून होणार आहे. त्यानंतर एकदिवसीय मालिका १९ जानेवारीपासून सुरू होणार आहे. दक्षिण आफ्रिकेची राष्ट्रीय निवड समिती त्याच कोअर ग्रुपसोबत गेली आहे. जिनेया वर्षी जूनमध्येवेस्ट इंडिजचा यशस्वी दौरा केला होता. कगिसो रबाडा, क्विंटन डी कॉक आणि एनरिक नॉर्किया या मालिकेत पुनरागमन करत आहेत. सीमर डुआन ऑलिव्हियरनेही प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन केले आहे. २९ वर्षीय ऑलिव्हियरनेसीएसए चार दिवसीय मालिकेत जोरदार पुनरागमन केले आहे. ऑलिव्हियरने८ डावात ११.१४ च्या सरासरीने२८ विकेट घेतल्या. ५३ धावांत ५ बळी ही त्याची सर्वत्तम कामगिरी होती. यामुळे त्याला संघात स्थान मिळाले आहे. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने सिसांडा मगाला आणि रायन रिकेल्टन या दोन नवीन खेळाडूंना आपल्या संघात स्थान दिले आहे. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज मगालाने यापूर्वी दक्षिण आफ्रिकेसाठी एक एकदिवसीय आणि चार टी-२० सामने खेळलेआहेत. याशिवाय रिकेल्टन हा डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज असून त्याला संधी मिळाल्यास तो दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना दिसेल. कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीचे नेतृत्व कागिसो राडाबा, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्किया ​​आणि केशव महाराज या चौकडीकडेअसेल. त्याचबरोबर कर्णधार एल्गर, डेकॉक, एडन मार्कराम, बाऊमा फलंदाजीत जोर देताना दिसणार आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …