टीम इंडियाला धक्का, श्रीलंकेने हिसकावला पहिला क्रमांक

मुंबई – टीम इंडिया गुरुवारी न्यूझीलंड विरुद्ध पहिली कसोटी खेळण्यासाठी कानपूरच्या ग्रीनपार्क मैदानात उतरली. ही कसोटी सुरू झाल्यानंतर काही तासांमध्येच टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला. हा धक्का न्यूझीलंडने कानपूरच्या मैदानात दिला नाही, तर श्रीलंक ा क्रिकेट संघाने आपल्या देशातील गॉलच्या मैदानात दिला. श्रीलंकेने गॉलमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीमध्ये वेस्ट इंडिजचा १८७ धावांनी पराभव केला. वेस्ट इंडिजला ही कसोटी जिंकण्यासाठी चौथ्या इनिंगमध्ये ३४८ धावांचे लक्ष्य होते. त्यांची संपूर्ण टीम १६० धावा काढून सर्वबाद झाली. त्यामुळे श्रीलंकेची टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपम स्पर्धेत टीम इंडियाला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. अर्थात अजूनही टीम इंडियाचे एकूण पॉईंट्स जास्त आहेत.
श्रीलंकेने वेस्ट इंडिजला हरवून १२ पॉईंट्सची कमाई केली. या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधील ही श्रीलंकेची पहिलीच कसोटी होती. त्यामुळे त्यांची सरासरी आता १०० टक्के आहे. आयसीसीच्या नियमानुसार एकूण टक्केवारीच्या आधारावरच टॉप टीमचा निर्णय होणार आहे. टीम इंडियाचे सध्या २६ पॉईंट्स आहेत. प्रत्येक सामना जिंकल्यानंतर १२ तर ड्रॉ झाल्यानंतर ४ पॉईंट्स मिळतात. टीम इंडियाने कानपूर कसोटीपूर्वी चार सामने खेळले आहेत. यापैकी दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला असून एक सामना हरली आहे, तर एक ड्रॉ झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाचे एकूण २८ पॉईंट्स व्हायला हवेत, पण इंग्लंड विरुद्ध स्लो ओव्हर रेटमुळे टीमचे दोन पॉईंट्स कमी झाले आहेत. चार सामन्यांनंतर सरासरीचा विचार केला, तर टीम इंडियाकडे सध्या ५४ टक्के पॉईंट्स आहेत.
पाकिस्तान तिसरे
पाकिस्तानने या चॅम्पियनशीप स्पर्धेत दोन कसोट्या खेळल्या आहेत. त्यापैकी एक जिंकली असून, एका कसोटीमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे त्यांचे १२ पॉईंट्स असून सरारी ५० टक्के आहे. पाकिस्तानची टीम सध्या पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजची टीम ३३.३३ पॉईंट्ससह चौथ्या तर इंग्लंडची टीम २९.१७ पॉईंट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे. अन्य चार टीमनी अद्यापही एकही कसोटी खेळलेली नाही.
न्यूझीलंडची ही पहिलीच कसोटी आहे. बांगलादेश २६ नोव्हेंबरपासून पाकिस्तान विरुद्ध पहिली कसोटी खेळणार आहे, तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका पुढील महिन्यात या स्पर्धेला सुरुवात करतील.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …