नवी दिल्ली – टीम इंडियाचा खेळाडू कुलदीप यादवने मंगळवारी (१४ डिसेंबर) आपला २७वा वाढदिवस साजरा केला. त्याचा जन्म १९९४ कानपूरमध्ये झाला होता. सध्या कुलदीप यादवचा फॉर्म चांगला नसला, तरी बऱ्याचदा अनेक बॅटसमन त्याला घाबरतात. कुलदीप यादवला गेल्या काही काळापासून टीम इंडियामध्ये कधी संधी मिळते, तर कधी मिळत नाही. कुलदीप यादवची टीम इंडियाचा ‘चायनामन’ म्हणून ओळख आहे. एकदा त्याच्या मनात आत्महत्येचा विचार आला होता, असे त्याने एका मुलाखतीत सांगितले आहे. कुलदीपच्या जीवनात अनेक चढ-उतार आल्याचे त्याने सांगितले आहे.
कुलदीप यादव त्यावेळी १३ वर्षांचा होता. उत्तर प्रदेश राज्याच्या टीममध्ये अंडर-१५ च्या टीममध्ये निवड न झाल्याने त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. कुलदीप यादव निराश झाला होता. त्याने क्रिकेट देखील सोडून देण्याचा निर्णय घेतला होता, मात्र कठोर परिश्रमामुळे ते चित्र बदलले आणि तो टीम इंडियापर्यंत पोहोचला. एका वाहिनीवरील मुलाखतीत त्याने बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. अडंर-१५ संघात निवड व्हावी, यासाठी खूपच मेहनत घेतली होती, पण निवड झालीच नाही. तेव्हा मी खूप निराश झालो होतो. आत्महत्येचा विचारही केला होता. पण, वडिलांनी नैराश्यातून बाहेर काढले, असे कुलदीप यादवने सांगितले आहे.
कुलदीपने क्रिकेटच्या तिनही प्रकारात पाच विकेट घेतल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो दुसरा फलंदाज आहे, तर एकमेव फिरकीपटू. अशी कामगिरी भुवनेश्वर कुमारने केली आहे. वनडे, कसोटी आणि टी-२०मध्ये पाच विकेट घेणारा तो जगातील फक्त तिसरा फिरकी गोलंदाज आहे. कुलदीप वगळता दक्षिण आफ्रिकेचा इमरान ताहीर आणि श्रीलंकेचा अजंता मेंडिस यांनी ही कामगिरी केली आहे. याशिवाय, भारताकडून एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद १०० विकेट्स घेण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन हॅट्ट्रिक करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.
देशांतर्गत सामन्यामध्ये खेळणारा कुलदीप कोलकाता नाईट रायडर्सकडून क्रिकेट खेळत होता. कोलकाता नाईट रायरडर्सकडून खेळताना कुलदीप यादवने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला ‘टीम इंडिया’चे दार उघडले. २०१४ मध्ये आयसीसी अंडर-१९ मध्ये त्याने हॅट्ट्रिक केली. कुलदीप यादव भुवनेश्वर कुमारनंतर टेस्ट, वनडे आणि टी-२० मध्ये ५ विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. कुलदीप यादव १८ डिसेंबर, २०१९ रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक करणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. कुलदीपने २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५ मार्च २०१७ रोजी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …