टायगर ऑफ म्हैसूर म्हणून ओळख असलेले टीपू सुल्तान यांच्या नावाने ब्रिटिश घाबरत होते. म्हैसूरचे शासक टीपू सुल्तान जोपर्यंत जीवंत होते, तोपर्यंत इंग्रजांचे सर्वात मोठे वैरी बनून राहिले. त्यांच्या मृत्यूनंतर इंग्रजांनी म्हैसूरवर ताबा मिळवला आणि त्यांचा खजिना लुटला. सध्या ब्रिटनकडे टीपू सुल्तान यांच्या सोन्यापासून तयार सिंहासनाचा भाग असलेलं सोन्याचं वाघाचं मुंडकं आहे आणि ते विकण्यासाठी ब्रिटन खरेदीदार शोधत आहे. हे सोन्यापासून तयार वाघाचं मुंडकं आहे आणि यात रूबी आणि पन्नासारखे दुर्मीळ रत्न लावले आहेत. याची किंमत १५ कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.
टीपू सुल्तान यांचे वाघ प्रतीक मानले जात होते. हा वाघ ब्रिटिश सरकारने प्रतिबंधित निर्यात यादीत ठेवल्याने ब्रिटनच्या एखाद्या गॅलरी किंवा संस्थानला ही ऐतिहासिक वस्तू खरेदी करण्याची संधी मिळू शकते. ब्रिटनचे कला मंत्री लॉर्ड स्टीफन पार्किन्सन म्हणाले की, हा चमकदार मुकुट टीपू सुल्तानच्या शासनाची कहाणी दर्शवतो आणि आपल्याला आपल्या शाही इतिहासात घेऊन जातो. मला आशा आहे की, ब्रिटनचा एखादा खरेदीदार समोर येईल. जेणेकरून आपल्या भारतासोबतच्या इतिहासाबाबत अधिक जाणू शकेल.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …