टीईटी परीक्षा घोटाळा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय

  • शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची होणार पडताळणी

मुंबई – राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा उघडकीस आला होता. त्यानंतर आता राज्यातील प्राथमिक-माध्यमिक शिक्षकांच्या शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्रांची पडताळणी होणार आहे. १३ फेब्रुवारी २०१३ नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिले आहे. राज्यातील शिक्षण उपसंचालक, सर्व जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांना याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
ही करवाई तातडीने करण्यात येणार असून, ७ जानेवारी २०२२ पर्यंत म्हणजेच दोन दिवसांत प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जे शिक्षक प्रमाणपत्र सादर करणार नाही त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा स्थानिक शिक्षण अधिकाऱ्यांनी दिला आहे. शिक्षकांकडून त्यांचे संपूर्ण नाव, एमएएचएटीईटी (महा टीईटी)चा बैठक क्रमांक, पेपर क्रमांक, उत्तीर्ण वर्ष आणि शेरा ही संपूर्ण माहिती मागवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी टीईटी परीक्षा घोटाळ्यात आणखी एक माहिती समोर आली होती. तुकाराम सुपेंचा ड्रायव्हर विद्यार्थ्यांची नावे आणि हॉलतिकिट आरोपींना पुरवत असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली होती. महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे निलंबित आयुक्त तुकाराम सुपे यांनी पाठवलेली विद्यार्थ्यांची नावे आणि हॉलतिकिट त्यांच्या कार्यालयीन गाडीवर चालक असलेला सुनील घोलप इतर आरोपींना पाठवत असल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न झाले होते. घोलप यांच्यासह मनोज शिवाजी डोंगरे यास सायबर पोलिसांनी अटक केली होती.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …