टीईटी परीक्षा घोटाळा : नाशिक आणि जळगावमधून दोघांना अटक

  •  पुणे सायबर पोलिसांची कारवाई

पुणे – टीईटी परीक्षा घोटाळाप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. या दोघांना नाशिक आणि जळगावमधून अटक करण्यात आली आहे, तसेच बीडमधूनही एका शिक्षकाला ताब्यात घेतल्याचे बोलले जात आहे, पण त्याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
नाशिक येथून आरोग्य विभागातील एका टेक्निशियनला आणि चाळीसगाव येथून जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाला, तर बीडमधूनही नागरगोजे नावाच्या शिक्षक एजंटला ताब्यात घेण्यात आले आहे. नाशिक आणि जळगाव येथून अटक करण्यात आलेल्या दोघांनी मिळून ३५० परीक्षार्थींकडून ३ कोटी ८५ लाख रुपये घेतले आणि ते एजंटमार्फेत मुख्य आरोपींना दिल्याची बाब तपासात समोर आली आहे. सुरंजित गुलाब पाटील (५०, रा. नाशिक) आणि स्वप्नील तीरसिंग पाटील (रा. जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या दोघांना १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, यापूर्वी अटकेत असलेले सुनील खंडू घोलप (४८, रा. भोसरी) आणि मनोज शिवाजी डोंगरे (४५, रा. लातूर) यांना ११ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात १३ आरोपींना अटक करण्यात आली असून, ४ कोटी ६८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …