टीईटी घोटाळा : अभिषेक सावरीकरने गुण बदलण्यासाठी ५ कोटी दिले

  •  अश्विन कुमारचा दावा; पोलिसांची माहिती

पुणे – शिक्षक पात्रता परीक्षेतील म्हणजेच टीईटी घोटाळ्यातील विविध नव्या गोष्टी समोर येत आहेत. २०१८च्या टीईटी परीक्षेत सुमारे ६०० ते ७०० विद्यार्थ्यांचे गुण बदलण्यासाठी पाच कोटींचा व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिक्षण विभागातील तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकरने पाच कोटी रुपये दिल्याचा जीए सॉफ्टवेअरच्या अश्विन कुमारने दावा केला आहे. पोलिसांच्या तपासात अश्विन कुमारने हा दावा केल्याची माहिती सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयाला दिली.
टीईटी २०१८ च्या परीक्षेत सुमारे ६०० ते ७०० विद्यार्थ्यांचे गुण बदलण्यासाठी अभिषेक सावरीकरने पाच कोटी रुपये दिल्याचा दावा जीए सॉफ्टवेअरच्या अश्विन कुमारने केला आहे. जीए टेक्नॉलॉजी कंपनीचा तत्कालीन संचालक अश्विन कुमारला २० ते २१ डिसेंबरदरम्यान बंगळुरूमधून अटक करण्यात आली होती. पुणे सायबर पोलिसांनी याप्रकरणी थेट राज्याबाहेर कारवाई केलेली. या प्रकरणाचे धागेदोरे हे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताना दिसत आहे. २०१७ मध्ये आश्विन कुमार हा जीए टेक्नॉलॉजीचा संचालक होता, तसेच पुणे सायबर पोलिसांकडून टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील लखनऊमधून एकाला अटक केली. सौरभ त्रिपाठी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे सायबर पोलिसांनी सौरभ त्रिपाठीला पुण्यात आणले. सौरभ त्रिपाठी हा जीए टेक्नॉलॉजी कंपनीशी संबंधित असल्याची माहिती समोर आली होती. सौरभ त्रिपाठी हा विनर कंपनी चालवत असल्याची माहिती आहे.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …