ठळक बातम्या

टायपिंग परीक्षेला निघालेल्या तीन विद्यार्थ्यांचा कार अपघातात मृत्यू


जालना – येथील घनसावंगी येथे शुक्रवारी २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास एक भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. या अपघातात तीन विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहितीही समोर येत आहे. मृत्यू पावलेले तिघेही विद्यार्थी असल्याचेसमोर आलेआहे. यामध्येदोन तरुणींसह एका तरुणाचा समावेश आहे.
जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे अंबर रोडवर आज सकाळी ११ च्या सुमारास विद्यार्थी असलेली कार घनसावंगी येथील पेट्रोल पंपासमोर जात होती. याचवेळी समोरुन येणाºया दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार चालकाचेनियंत्रण सुटले. ज्यामुळे कार रस्त्यालगत पलटली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. आरती मिरकर (२५) सुनील जाधव (३०) आणि वंदना राजगुरू (२४) असं या तिघांचं नाव आहे, तर कारमधील आणखी एका व्यक्तीला जबर मार लागल्यानेत्याला जालना येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. अपघातात गाडीचेही संपूर्णपणे नुकसान झाले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …