टायगर श्रॉफने शेअर केले शर्टलेस फोटो

अभिनेता टायगर श्रॉफ चित्रपटातील आपल्या जबरदस्त ॲक्शन आणि आपल्या फिटनेसमुळे खूप चर्चेत असतो. तो नेहमी सोशल मीडियावर आपल्या वर्कआऊट सेशनचे फोटो व व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. आता सोमवारी त्याने आपले ॲब्स फ्लाँट करतानाचे फोटो शेअर केले आहेत.
हे फोटो टायगरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत. फोटोत टायगर शर्टलेस होऊन आरशासमोर सेल्फी घेताना दिसून येतोय. त्यावेळी टायगरने हॅट आणि सन ग्लासेसदेखील घातले आहेत. हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत टायगरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, उधारीवर घेतलेली टोपी खूप छान दिसत आहे, परंतु कदाचित ही नंतर हटवली जाईल. टायगरचे हे फोटो त्याच्या चाहत्यांना चांगलेच आवडले आहेत. आतापर्यंत तीन लाखांहून अधिक लोकांनी या फोटोंना लाइक केले आहे. टायगरच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले, तर तो लवकरच हिरोपंती-२ मध्ये तारा सुतारिया व नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्यासोबत दिसून येणार आहे. हा चित्रपट ईदचे औचित्य साधून २९ एप्रिल रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …