ठळक बातम्या

टांझानियातून आलेल्या व्यक्तिच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी सुरू

महापालिका ‘त्या’ प्रवाशांची बॅक हिस्ट्रीही तपासणार
मुंबई – जगभरात चिंता वाढवणारा घातक ओमिक्रोन या कोरोनाच्या नव्या व्हॅरियंटचा पहिला रुग्ण मुंबईत सापडल्याने चिंता वाढली आहे. त्यात आता धारावीसारख्या गजबजलेल्या झोपडपट्टीत टांझानिया येथून आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने चिंतेत भर पडली आहे. या रुग्णाची जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी केली जात आहे. त्यामुळे चाचणीच्या अहवालानंतर त्याला ओमायक्रोनची लागण झाली आहे का? हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. तसेच हाय रिस्क कंट्रीतून आलेल्या नागरिकांची बॅक हिस्ट्रीही तपासली जात असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. ओमिक्रॉनचा फैलाव होऊ नये यासाठी आमचे प्रयत्नसुरू आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केले. मीडियाशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
गेल्या काही दिवसांत मुंबई विमानतळावर आलेल्या परदेशी प्रवाशांचा शोध घेऊन त्यांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. आतापर्यंत २,७९४ परदेशी प्रवाशांच्या चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी १३ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोनाच्या काळात महापालिका अधिकाऱ्यांनी धारावीत प्रचंड काम केलं. धारावीकरांनी त्याला मोलाची साथ दिली. आता धारावीतील रुग्ण संख्या शून्यावर आणण्यावर भर आहे. धारावीत टांझानियातून आलेला व्यक्ती पॉझिटिव्ह सापडला आहे. पण त्याचे अहवाल आल्यावरच त्याला कोरोनाची लागण आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे. हा अहवाल आल्यानंतरच पुढील उपाययोजना केल्या जाईल, असं पेडणेकर यांनी स्पष्ट केलं. ओमिक्रॉनला फैलाव होऊ नये म्हणून मुंबई महापालिकेने खूप काळजी घेतली आहे. ओमिक्रॉनचं संकट वाढत चालले आहे. शनिवारी डोंबिवली येथील एका प्रवाशाला ओमायक्रोनची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर टांझानिया येथून धारावीत आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णाच्या रक्ताचे सॅम्पल जिनोम सिक्वेन्सिंग चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या चाचणीच्या अहवालानंतर त्याला ओमायक्रॉनची लागण झाली आहे का, हे स्पष्ट होणार आहे , असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्ष आपल्याला कडक नियम पाळावे लागले. पण संकट अजून गेलेले नाही. त्यात आता नव्या विषाणूचे संकट आले आहे. त्यामुळे सर्वांनी नियम पाळावे , असे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवा आजार रोखण्यासाठी जे जे करता येईल, ते ते करा अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळेच आम्ही सज्ज झालो आहोत. आमची टीम कार्यरत आहे. महापरिनिर्वाण दिनी भीम सैनिक मोठ्या प्रमाणावर चैत्यभूमीवर येतात. त्यांचीही काळजी घेतली जाणार आहे. आंबेडकरी अनुयायी घरी जाईपर्यंत त्यांची काळजी घेण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …