झोपेत तिच्या ओठांना चावला किडा; सकाळपर्यंत झाली भयानक अवस्था

ब्राझीलमध्ये राहणाºया २१ वर्षीय नताली गाल्डिनोला दोन दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वास्तविक, नताली झोपेत असताना एका किड्याने तिच्या ओठांवर चावा घेतला होता. यामुळे नतालीची प्रकृती बिघडली.
ब्राझीलमध्ये राहणाºया नतालीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो स्वत: नतालीने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नतालीला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा तिला श्वासोच्छ्वासाचा त्रास होत होता. अत्यंत गंभीर अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. नताली हॉस्पिटलमध्ये पोहोचली, तेव्हा तिचे ओठ खूप सुजले होते. नंतर किड्याने तिच्या ओठांना चावल्याचे आढळून आले.

नताली घरात झोपली होती. यानंतर रात्री किड्याने तिच्या ओठांना चावा घेतला. अशा स्थितीत नताली सुजलेल्या ओठांसह रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला दोन दिवस रुग्णालयात ठेवण्यात आले होते. येथील एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, नतालीचे ओठ पाहून असे वाटत होते की, तिने ओठांची शस्त्रक्रिया केली आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तिने सांगितले की, घटनेच्या वेळी ती झोपली होती. अचानक तिच्या वरच्या ओठावर कोणीतरी सुई टोचल्याचा भास झाला. यानंतर तिची नजर चादरीवर चालणाºया एका किड्यावर पडली.
तिचा त्रास अचानक इतका वाढला की, तिने उठून खोलीचे दिवे लावले. तिने आरशात पाहिले की, तिच्या ओठावर एक कट आहे. सोबतच तिच्या अंथरुणावर एक किडा चालत होता. तो विषारी नाही हे नतालीला माहीत होते; पण तिला खूप वेदना होत होत्या. याशिवाय तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे तिने तातडीने हॉस्पिटल गाठले. डॉक्टरांनी लगेच तिला पेन किलर आणि अ‍ॅलर्जीचे औषध दिले. दोन दिवसांनी तिला डिस्चार्ज देण्यात आला.

उपचारानंतर आता नतालीची प्रकृती बरी झाली आहे. हॉस्पिटलमधून आल्यानंतर तिने इन्स्टाग्रामवर तिची गोष्ट शेअर केली. तिने तिच्या मित्रमंडळींना घराभोवती असलेल्या अशा किड्यांपासून स्वत:ची काळजी घेण्याचा सल्ला दिला. नतालीने सांगितले की, सध्याच्या हंगामात जेव्हा आर्द्रता वाढते, तेव्हा असे प्राणी घरात सहज दिसतात. अशा परिस्थितीत लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …