जर्मनीत राहणारा डॅनियल श्मिट याला एक अशी समस्या आहे की, त्याबद्दल कोणी विचार करू शकत नाही आणि ते जाणून घेतल्यावर विश्वास बसत नाही. रात्री जेव्हा डॅनियल झोपतो, तेव्हा त्याला त्याच्या संपूर्ण दिवसाचा लेखाजोखा आठवतो. म्हणजेच दिवसभर काय केले, कुठे गेलो, काय सापडले, काय खाल्ले हे त्याला माहीत असते, पण रात्री झोपल्यावर आणि दुसºया दिवशी सकाळी उठल्यावर तो आदल्या दिवशीचे सर्व काही विसरलेला असतो.
जर तुम्ही आमिर खान स्टारर ‘गजनी’ पाहिला असेल, तर तुम्हाला आमिरने साकारलेली ‘संजय सिंघानिया’ची भूमिकाही आठवत असेल. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यावर तो सर्व काही विसरून जातो. त्याची स्मरणशक्ती कमी होते आणि त्याची स्मरणशक्ती काही मिनिटांसाठीच राहते. हा चित्रपट असला तरी प्रत्यक्षातही लोकांना असाच त्रास होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, ज्याची स्मरणशक्ती फक्त १ दिवस असते. रात्री झोपून दुसºया दिवशी सकाळी तो उठला की, त्याच्या स्मरणशक्तीची पाटी कोरी झालेली असते म्हणजे तो आधीचे सारे काही विसरलेला असतो.
१४ फेब्रुवारी २०१५ रोजी डॅनियल रस्ता अपघाताचा बळी ठरला होता. भरधाव कारने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्या मेंदूलाही दुखापत झाली होती. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केल्यानंतर तो वाचला, मात्र या अपघातामुळे त्याला एक आयुष्यभराची समस्या मात्र निर्माण झाली. तो स्मरणशक्ती जतन करू शकणार नव्हता. डॅनियलच्या मेंदूची समस्या अशी आहे की, तो शॉर्ट टर्म मेमरी लाँग टर्म मेमरीमध्ये बदलू शकत नाही. यामुळे डॅनियलला रोजच्या गोष्टी फार काळ लक्षात ठेवता येत नाहीत. येथील टीव्हीने डॅनियलवर एक डॉक्युमेंट्रीही बनवली आहे.
रिपोर्ट्सनुसार, डॅनियलला दुसºया दिवसापर्यंत लोकांचे आवाज आणि काही गोष्टी आठवतात ज्यांच्याशी तो जोडतो. खूप दिवसांनी कोणी भेटले तर तो त्याला पूर्णपणे विसरतो. हेच कारण आहे की, डॅनियल रोजच्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवतो, जेणेकरून तो दुसºया दिवशी विसरू नये. डॅनियलची एक मैत्रीणदेखील आहे, जिला तो एकेकाळी भेटत असे जेणेकरून तो तिला कधीही विसरू नये, मात्र आता दोघेही वेगळे झाले आहेत. तरीही डॅनियलला त्याच्या मुलामुळे तिला दररोज भेटायचे आहे.