ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी सोहळ्याला हजारो भाविकांची उपस्थिती

  •  किरणोत्सवाचा देखणा सोहळा

पैठण – तालुक्यातील आपेगाव येथे गुरुवारी संत ज्ञानेश्वर माऊलींचा समाधी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. गेल्या काही दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण होते, त्यामुळे माऊलींच्या मुखावर पडणारा किरणोत्सव अनुभवता येईल की नाही, अशी चिंता भाविकांना होती, मात्र दुपारी सूर्यदर्शन झाले आणि भाविकांमध्ये एकच आनंदाची लाट पसरली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७३५ व्या संजीवन समाधी सोहळ्याची ज्ञानोबा माऊलींच्या गजरात भक्तिमय वातावरणात सांगता झाली. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने दहीहंडी फोडून कार्तिकी काल्याची सांगता झाली.
आपेगाव येथे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. वारकऱ्यांनी सकाळपासूनच किरणोत्सव पाहण्यासाठी मंदिरात मिळेल तिथे जागा धरली होती. दुपारी ठिक १२.५२ वाजता सूर्यदर्शन झाले आणि माऊलींच्या तेजोमय मूर्तीवर काही काळ सूर्यकिरणे पडली. माऊलींच्या दर्शनासाठी सूर्यदेवही आले. हा विलक्षण सोहळा भाविकांनी याचि देही याचि डोळा अनुभवला. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त मंदिरात फुलांची आरास करण्यात आली होती. सकाळी काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. गोदा काठावर भल्या पहाटेपासूनच स्नान करत महाराष्ट्रातून आलेल्या हजारो भाविकांनी ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेतले. नंतर संस्थानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांच्या हस्ते दहीहंडी फोडून कार्तिक काला सोहळ्याची सांगता करण्यात आली.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …