ठळक बातम्या

जो रूट एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारा कर्णधार

मेलबर्न – इंग्लंडचा कर्णधार जो रूट ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या ॲशेस कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी रविवारी येथे आपल्या अर्धशतकीय खेळीदरम्यान एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारा कर्णधार बनला आहे. रूटने इंग्लंडच्या पहिल्या डावात ५० धावा केल्या, ज्यामुळे वर्ष २०२१ मध्ये त्याच्या एकूण धावा १६८० झाला. अशाप्रकारे तो एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारा कर्णधार बनला. रूटने दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅम स्मिथ (२००८ मध्ये १६५६ धावा)च्या विक्रमाला पिछाडीवर टाकले. ऑस्ट्रेलियाचा माइकल क्लार्क (२०१२ मध्ये १५९५) या सूचीत तिसऱ्या स्थानी आहे. रूट जर इंग्लंडच्या दुसऱ्या डावात १०९ धावा करतो, तर एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनेल. सध्या हा रेकॉर्ड पाकिस्तानच्या मोहम्मद युसूफच्या नावे आहे, ज्याने २००६ मध्ये १७८८ धावा केल्या होत्या. या यादीत रूट अद्याप युसूफ व विवियन रिचर्ड्स (१९७६ मध्ये १७१०) नंतर तिसऱ्या स्थानी आहे. स्मिथ या यादीत चौथ्या स्थानी सरकला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

One comment