जोहान्सबर्गला जाताना विमानात विराटने इशांत शर्माला डिवचले

जोहान्सबर्ग – भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी गुरुवारी जोहान्सबर्गमध्ये दाखल झाली आहे. बीसीसीआयने शुक्रवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून भारतीय संघाबाबत अपडेट दिली. मुंबई-जोहान्सबर्ग विमान प्रवासातील गंमती-जमतीचा व्हिडीओ बीसीसीआयने ट्विटरवर पोस्ट केला आहे. यामध्ये कर्णधार विराट कोहलीसह सर्वच खेळाडू चांगल्या मूडमध्ये मजा, मस्करी करताना दिसत आहेत. बीसीसीआय आणि कोहलीमध्ये वाद सुरू असले, तरी त्याची छाया संघावर पडलेली नाही. सध्या कोरोना काळ सुरू असला, तरी दक्षिण आफ्रिकेत हॉटेलवर दाखल झाल्यानंतर भारतीय संघाचे पारंपरिक आफ्रिकन पद्धतीने नृत्याच्या तालावर स्वागत करण्यात आले. विराट कोहलीने विमान प्रवासात इशांत शर्माची चांगलीच फिरकी घेतली. सूटकेस सोबत असेल, तर इशांत जगात कुठेही प्रवास करण्यासाठी तयार आहे, असे विराट या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसतो. त्यावर इशांतने सकाळी, सकाळी हे काम करू नकोस, असे त्याला सांगितले. कोहली-इशांतशिवाय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि श्रेयस अय्यरही हास्य विनोदात रमल्याचे व्हिडीओमध्ये दिसले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …