ठळक बातम्या

जैन मुनी नय पद्मसागर महाराज राज ठाकरेंच्या भेटीला

मुंबई – जैन इंटरनेशनल ऑर्गनायझेशनचे संस्थापक जैन साधू गुरुदेव नय पद्मसागरजी महाराज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या निवासस्थानी भेटीला शिवतीर्थ येथे आले होते. मंगळवारी सकाळी साडेसातच्या दरम्यान नय पद्मसागर महाराज हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आले. राज ठाकरे यांची सदिच्छा भेट आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी नय पद्मसागर हे शिवतीर्थवर आल्याची माहिती देण्यात आली. साधारणपणे दोन तास राज ठाकरे आणि जैन मुनी नय पद्मसागर यांच्यामध्ये चर्चा झाली. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी शिवतीर्थ या नव्या घरात प्रवेश केला आहे. त्यांना आशीर्वाद देण्यासाठी मुनी शिवतीर्थ इथे आले होते. कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. जैन परंपरेप्रमाणे राज ठाकरे यांच्या नव्या घरात ‘पगला’ विधी पार पडला आणि त्यासोबत नवकार मंत्रचा जप मुनींच्या माध्यमातून झाला असे जैन इंटरनेशनल ऑर्गनायझेशनचे पोलिटिकल हेड शैलेश मोदी यांनी माध्यमांना सांगितले. सोबतच, मुंबई आणि महाराष्ट्रात लोकांच्या अडचणी दूर व्हाव्यात आणि राज ठाकरे यांच्याकडून काहीतरी चांगले व्हावे, यासाठी मुनींकडून राज ठाकरे यांना आशीर्वाद देण्यात आल्याचे शैलेश मोदी म्हणाले. नय पद्मसागर महाराज यांचे अनेक राजकीय नेत्यांशी चांगले संबंध आहेत. राजकीय कार्यक्रमांना राजकीय नेत्यांसोबत त्यांना याआधी सुद्धा पाहिले गेले आहे. शिवाय अनेक राजकीय नेते त्यांची सदिच्छा भेट आणि आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शपथ विधी कार्यक्रमादरम्यान सुद्धा नय पद्मसागर महाराज हे शिवाजी पार्क येथे उपस्थित होते. नय पद्मसागर महाराज हे विविध ठिकाणी, विविध राज्यात जाऊन जैन समाजाला प्रबोधनाचे त्यासोबतच मार्गदर्शनाचे काम करतात. त्यामुळे जैन समाज मोठ्या संख्येने त्यांना मानणारा आहे. मुंबईमध्ये जैन समाजसुद्धा मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता या भेटीकडे राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा पाहिले जात आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …