ठळक बातम्या

जेव्हा पीसीने ओलांडली होती बोल्डनेसची सीमा

 

अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने देशभरातच नव्हे, तर अवघ्या जगभरात नाव कमावले आहे. त्यामुळे तिला ग्लोबल स्टार असेही म्हटले जाते. प्रियंका ही केवळ आपल्या अभिनयासाठीच नव्हे, तर तिच्या फॅशन सेंसकरिताही तितकीच ओळखली जाते. ती नेहमी पुरस्कार सोहळ्यांना किंवा मित्र-मैत्रिणींच्या पार्ट्यांना अतिशय युनिक ड्रेसमध्ये पाहायला मिळते, तर दुसरीकडे ती आपल्या अतरंगी फॅशनमुळे अनेकदा ट्रोलही झाली आहे. इतकेच नव्हे, तर आपल्या बोल्ड ड्रेसेसमुळे ती उप्स मोमेंटची शिकारही ठरली आहे. आताही तिच्या काही उप्स मोमेंटचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहेत.

खरेतर प्रियंकाचा व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ आजचा नाही, तर त्यावेळचा आहे, जेव्हा तिने एक पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. त्यावेळेस तिने इतका रिव्हिलींग आणि बोल्ड ड्रेस घातला होता की, तिला स्वत:ला वारंवार हा ड्रेस नीट करावा लागत होता. त्यावेळी प्रियंकाने काळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस घातला होता. तिच्या ड्रेसच्या एका बाजूला संपूर्ण कट होता आणि खालच्या बाजूस नेट लावण्यात आले होते. त्यातून तिच्या शरीराचा भाग स्पष्टपणे दिसत होता. त्याचबरोबर पीसीने या ड्रेसला मॅचिंग असे हाय हिल्स घातले होते. खरेतर आपल्या या थाय कट ड्रेसमध्ये प्रियंका खूपच अन्कम्फर्टेबल वाटत होती. त्यामुळे वारंवार ती आपल्या हाताने आपला ड्रेस नीट करताना दिसून येत होती, परंतु असे असूनही तिला त्यावेळेस उप्स मोमेंटचे शिकार व्हावे लागले आणि हा क्षणही कॅमेऱ्यात कैद झाला होता. या ड्रेसमुळे तिला प्रचंड ट्रोलही व्हावे लागले होते, ते वेगळेच. आता पुन्हा एकदा तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …