बॉलीवूडच्या उदयोन्मुख कलाकारांबद्दल बोलायचे झाले तर अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीचे नाव आवर्जून घेतले जाईल. सिद्धांत लवकरच यशराज फिल्म्सच्या ‘बंटी और बबली २’ या चित्रपटामध्ये दिसून येणार आहे. भलेही सिद्धांत आता वेगाने वाटचाल करताना दिसून येतोये,परंतु इथपर्यंत पोहचण्यासाठी त्याला प्रचंड स्ट्रगल करावे लागले आहे. आज तो ज्या यशराज फिल्म्स प्रोडक्शनच्या चित्रपटामध्ये काम करत आहे, कधी काळी त्याच स्टुडिओच्या बाहेरील टपरीवर बसून तो प्रतिक्षा करत असायचा.
यासंदर्भात सिद्धांत म्हणाला,’माझे यश राज फिल्म्स स्टुडिओसोबत खूप जुने नाते आहे. माझ्या कॉलेजच्या काळात मी माझ्या अनेक मित्रांसोबत स्टुडिओत ऑडिशन किंवा इंटर्नशीपकरिता फेऱ्या मारायचो. मी नेहमी त्यांच्यासोबत यायचो आणि नेहमी स्टुडिओच्या बाहेरील चहाच्या टपरीवर चहा पित बसायचो. खरेतर मी कधी स्टुडिओच्या आत गेलो नव्हतो. कारण माझे स्वप्न होते की, आदित्य चोप्रा सरांनी स्वत: मला ऑफिसमध्ये बोलवावे. मला जेव्हा ‘बंटी और बबली २’ मिळाला तेव्हा तो माझ्याकरिता खूप खास ठरला, कारण माझे स्वप्न पूर्ण झाले होते.’
‘बंटी और बबली २’ व्यतिरिक्त सिद्धांत हा शकुन बत्राच्या चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अनन्या पांडे यांच्याबरोबर दिसून येणार आहे. त्याचबरोबर तो कतरिना कैफ आणि इशान खट्टरबरोबर फोन भूतमध्येही चमकणार आहे.