करण जौहरचा लोकप्रिय चॅट शो कॉफी विद करण नेहमीच चर्चेत असतो. या शोमध्ये अनेकदा असेही खुलासे होतात ज्यावरुन वादंग निर्माण होते. अशाच एका एपिसोडमध्ये अभिनेता अनिल कपू, संजय दत्त आणि कंगना रानावत यांनी हजेरी लावली होती व रॅपिड फायर सेशन खेळले होते.
या सेशनमधील प्रश्नांनी हा शो मजेदार तेव्हा बनला जेव्हा होस्ट करण जौहरने अनिल कपूरला विचारणा केली होती की अशी कोणती महिला आहे जिच्याकरिता आपण आपल्या पत्नीला सोडून द्याल? तर त्यावर अनिल कपूर यांनी मस्करी मध्ये कंगनाच्या दिशेने इशारा केला व तिचे नाव घेत म्हटले होते की मी कंगनाकरिता आपल्या पत्नीला सोडून देईन. त्यावर करणने त्याच मस्करीच्या सुरात कंगनाला उद्देशून म्हटले होते की मला वाटते की तुला चिंता वाटायला हवी.’ तर दुसरा प्रश्न जेव्हा अनिल कपूर यांना करण्यात आला होता की संजय दत्तकडे असे काय आहे जे तुमच्याकडे नाहीयं? तर त्याला उत्तर देताना अनिलजी म्हणाले होते’ कोर्ट केस’
अनिल कपूरच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर तो जुग जुग जिओ या आगामी चित्रपटात वरुण धवन, कियारा आडवाणी व नितू कपूर यांच्याबरोबर दिसून येणार आहे.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …