जेनिफर लॉरेन्स पहिल्यांदा रेड कार्पेटवर फ्लॉँट केले बेबी बंप


हॉलीवूड ॲक्ट्रेस जेनिफर लॉरेंन्स एक प्रख्यात नाव आहे. गोष्ट ॲक्शन सीनची असो की अभिनयाची, जेनिफरने आपल्या टॅलेंटच्या जोरावर हॉलीवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जेनिफर ही आपल्या कामामुळे जगभरात ओळखली जाते. जेनिफर जितकी ग्लॅमरस आहे तितकेच ॲक्शन सीनही ती अगदी बेडरपणे करताना दिसून येते. जेव्हा ती पडद्यावर येते तेव्हा तिच्या अदा आणि सौंदर्य हे प्रेक्षकांची मने जिंकून घेण्यास पुरेसे ठरतात. रविवारी न्यूयॉर्क शहरात डोंट लुक अपच्या कार्पेट प्रिमियरमध्ये जेनिफर लॉरेन्सने पहिल्यांदाच आपले बेबी बंप फ्लॉँट केले. तिच्याबरोबर तिचा सह कलाकार लियोनाडार्ेही दिसून आला.
जेनिफर लॉरेंन्सने लिंकन सेंटरमध्ये आयोजित गाला इव्हेंटमध्ये फ्लोर लेंथ ग्लिटरिंग गोल्ड गाऊन मध्ये आपला जलवा दाखवला. तर डिकेप्रियोने एक फिट नेव्ही सूट परिधान केला होता. दोन्ही स्टार्सनी आपल्या लुकने जुन्या हॉलीवूड ग्लॅमरच्या आठवणी ताज्या केल्या. डोंट लुक अप फिल्म एडम मॅकेद्वारे लिखित असून तो दिग्दर्शितही ॲडमनेच केला आहे.
जेनिफर लॉरेन्सने आपल्या अभिनयाची सुरुवात टीव्ही शोजमध्ये सपोर्टींग ॲक्टरद्वारे केली होती. परंतु आज ती अमेरिकेतील हायेस्ट पेड ॲक्ट्रेसपैकी एक आहे. वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी जेनिफरने अकादमी ॲवॉर्ड तसेच गोल्डन ग्लोबल सारखे ॲवॉर्ड आपल्या नावावर केले होते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …