अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ही आपल्या आगामी चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. ती नेहमी सोशल मीडिया हँडलवर आपले फोटोज व व्हिडीओ शेअर करून चित्रपटाशी संबंधित अपडेट शेअर करत असते. यादरम्यान तिचा एक सेल्फी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यात ती अत्यंत मजेदार चेहरा करताना दिसून येतेय.
आपले हे फोटो जॅकलीनने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत जॅकलीन मजेदार चेहरा करताना दिसून येत आहे, तर दुसऱ्या फोटोत ती हसताना पाहायला मिळतेय. तिच्या या फोटोंना चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. आतापर्यंत या फोटोंना साडेसहा लाख लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर कमेंट करत ते आपली प्रतिक्रियाही देत आहेत.