सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह राहणाऱ्या जॅकलीन फर्नांडिसने आपला आगामी चित्रपट रामसेतुचे शूटिंग पुन्हा सुरू केले असल्याची माहिती चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू केल्याची माहिती जॅकलीनने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो शेअर करून दिली आहे. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. पहिल्या फोटोत जॅकलीन खाली बघताना दिसून येतेये तर दुसऱ्या फोटोत ती हसताना दिसून येतेये. हे फोटो इंटरनेटवर शेअर करत जॅकलीनने सांगितले की, ती रामसेतूच्या सेटवरून परतली आहे. यापूर्वी तिने उटी शेड्यूलचे फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले होते, ज्यात ती अभिनेता अक्षय कुमारबरोबर दिसून येतेये. या फोटोत दोघे एकमेकांकडे बघताना दिसून येतायेत. या चित्रपटाचे शूटिंग यावर्षी एप्रिलमध्ये श्रीराम जन्मभूमी अयोध्येत सुरू करण्यात आले होते, परंतु त्यानंतर अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाल्याने चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले होते. नंतर चित्रपटाच्या ४५ जणांच्या ज्युनिअर स्टाफलाही कोरोना झाल्याने चित्रपटाचे शूटिंग रोखण्यात आले होते. आता परिस्थिती पूर्ववत झाल्यावर पुन्हा चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली आहे.