जुलै महिन्यात म्हाडाकडून ४ हजार घरांची लॉटरी

मुंबई – येत्या जुलै महिन्यात म्हाडाच्या वतीने चार हजार घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे. सर्वसामान्यांना परवडणारी आणि स्वस्त घरे देण्यासाठी म्हाडा तत्पर असते, मात्र गेल्या तीन वर्षांपासून मुंबईकर म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची प्रतीक्षा करत होते. मुंबईत विविध ठिकाणी म्हाडाच्या वतीने घरे उभारण्यात येतात. आता अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी म्हाडाच्या वतीने येत्या जुलै महिन्यात लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
जुलै महिन्यात म्हाडातर्फे काढण्यात येणाऱ्या सोडतीतील घरे ही गोरेगाव डोंगर परिसरात असणार आहेत. सुमारे चार हजार घरांची सोडत काढण्यात येणार असून, यापैकी बहुतेक घरे ही अत्यल्प उत्पन्न गटासाठी आहेत. ही घरे वन रूम किचन या प्रकारात मोडणारी असून, यामाध्यमातून सुमारे १२३९ घरे उपलब्ध होणार आहेत. २३ मजल्यांच्या सात इमारतींमध्ये ही घरे असणार आहेत. तर उन्नत नगर क्रमांक २ येथेही अत्यल्प उत्पन्न गटासाठी ७०८ घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी सुमारे ७३६ घरे असणार आहेत, तर मध्यम उत्पन्न गटासाठी २२७ घरे उपलब्ध होतील. उच्च उत्पन्न गटासाठी १०५ घरे उपलब्ध होणार आहेत. गोरेगावपाठोपाठ अँटॉप हिल, कन्नमवार नगर याठिकाणीही म्हाडाकडून घरांची निर्मिती करण्यात येणार असून, या माध्यमातून सुमारे १ हजार घरे उपलब्ध होणार आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …