ठळक बातम्या

जुन्या वॉशिंग मशिन्सने उभारलेला पिरॅमिड

जगात दररोज असे रेकॉर्ड बनत आहेत, ज्याचा कधी विचारही केला नसेल. काहीजण सापाला दातांमध्ये धरतात, तर काहींनी काही सेकंदांत अनेक मास्क घातले. काही लोक अनोख्या गोष्टी गोळा करून रेकॉर्डही करतात. आता ब्रिटनमधील एका कंपनीने जुन्या वॉशिंग मशीन गोळा करून सर्वात मोठा पिरॅमिड करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. या कंपनीने पिरॅमिडमध्ये हजारो रिसायकल वॉशिंग मशीन जोडण्याचा अनोखा विक्रम केला आहे.
तुम्ही लोकांना रद्दीतून जंक वस्तू बनवताना ऐकले असेल आणि पाहिले असेल, पण जंकपासून विचित्र विश्व रेकॉर्ड बनवण्याचे काम प्रथमच ब्रिटनची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी उ४११८२ ढउ हङ्म१’ िने केले आहे. इलेक्ट्रॉनिक रिसायकलिंगला प्रोत्साहन देणाºया या कंपनीने वॉशिंग मशीनचा सर्वात उंच पिरॅमिड बनवण्याचा जागतिक विक्रम केला आहे.

उ४११८२ ढउ हङ्म१’ िया कंपनीने मशीन जोडून ४४ फूट ७ इंच लांबीचा पिरॅमिड उभारून सर्वात मोठा वॉशिंग मशीन पिरॅमिड तयार केला आहे. कंपनीने ४४ फूट पिरॅमिडमध्ये १,४९६ रिसायकल वॉशिंग मशीन जोडून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे.
करीज पीसी वर्ल्डच्या या विक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने पुष्टी केली आणि सांगितले की पिरॅमिड ४४ फूट ७ इंच उंच बांधला गेला आहे. कंपनीने सप्टेंबर २०२१ मध्ये राष्ट्रीय पुनर्वापर सप्ताहादरम्यान सर्वात मोठ्या वॉशिंग मशीन पिरॅमिडचा पहिला विक्रम प्रस्थापित करण्याचा निर्णय घेतला. कंपनीचे म्हणणे आहे की, त्यांना इलेक्ट्रॉनिक कचरा हाताळण्याबाबत लोकांना जागरूक करायचे आहे. या रेकॉर्ड-होल्डिंग पिरॅमिडमध्ये एकूण १४९६ वॉशिंग मशीनचा समावेश करण्यात आला होता. ही भव्य रचना कंपनीच्या ‘न्यू लाइफ नॉट लँडफिल’ प्रकल्पाचा एक भाग आहे.

रेकॉर्डची कल्पना करी प्रेस्टन स्टोअर मॅनेजर डॅरेन केनवर्थीची होती, ज्यांनी आपल्या कर्मचा‍ºयांना काम करण्यास प्रवृत्त केले. पिरॅमिड बनवण्यासाठी वापरण्यात आलेल्या सर्व वॉशिंग मशिन्सचा पुनर्वापर केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. युनायटेड किंगडममध्ये दरवर्षी १.४५ दशलक्ष टन ई-कचरा तयार होतो, असा अंदाज आहे. रेकॉर्डसाठी बांधलेला हा अनोखा पिरॅमिड लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. याद्वारे लोक इलेक्ट्रॉनिक कचरा आणि त्याच्या व्यवस्थापनाशी संबंधित गोष्टी जाणून घेत आहेत. जास्तीत जास्त ई-कचºयाचा पुनर्वापर करून पर्यावरणाला वाईट परिणामांपासून वाचवणे हा कंपनीचा उद्देश आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …