ठळक बातम्या

जी ले जरा…

 

शहनाज गील नुकतीच आपल्या एका फ्रेंडच्या एंगेजमेंटला गेली होती. या फंक्शनचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. ते पाहून पहिल्यांदाच शहनाजच्या चाहत्यांना थोडा दिलासा मिळाला आहे, कारण त्यात शहनाज खूप एंजॉय करताना दिसून येत आहे. तसे पाहिले तर शहनाजचे सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. शहनाजने लवकरात लवकर नॉर्मल होऊन आपले आयुष्य जगावे, अशी प्रार्थना तिचे चाहते नेहमीच करत असतात.
सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर पहिल्यांदाच शहनाज इतके एंजॉय करताना पाहायला मिळाली आहे. शहना आर्टिस्ट आणि निर्माता कौशलच्या एंगेजमेंटला गेली होती. त्यावेळी तिने काळ्या रंगाचा कॉकटेल गाऊन परिधान केला होता. त्यात ती नेहमीसारखीच खूप सुंदर दिसत होती. तिच्यासोबत कश्मीरा शाह, जॉर्जिया एंड्रियानीसह त्यांचे अन्य काही फ्रेंड्सही दिसून आले. या फंक्शनचे फोटो आणि व्हिडीओ शहनाजच्या फॅन पेजवर व्हायरल आहेत. व्हिडीओमध्ये शहनाज ही ग्रुपसोबत झिंगाट गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहे. तिच्या चाहत्यांनी हा व्हिडीओ शेअर करत तिला असेच स्ट्राँग राहण्यास सांगितले आहे. शहनाजने आपला भूतकाळ विसरून पुढची वाटचाल करावी, अशीच त्यांची इच्छा आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …