मुंबई – महागाईचा आलेख वाढता वाढत आहे. आता कपडे, चपला महागणार आहेत. जीएसटी वाढला असल्याने कपड्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. कपडे, चपलांवरचा जीएसटी ५ टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात आला आहे.
नव्या वर्षात तयार कपडे, चपला महागणार आहेत. १ जानेवारीपासून नवे दर लागू होणार आहेत. जीएसटीचा दर ५ टक्क्यांवरून १२ टक्के करण्याबाबतची अधिसूचना केंद्रीय मंत्रालयाने जारी केली आहे. सध्या तयार कपडे तसेच सूत आणि सुती कापड यावर वेगवेगळ्या दराने जीएसटी आकारला जात आहे. त्यामुळे सुसूत्रता आणण्याचा निर्णय जीएसटी परिषदेच्या बैठकीमध्ये झाला. येत्या १ जानेवारीपासून याची अंमलबजावणी होणार आहे.
एक हजार रुपयांवरून अधिक किमतीच्या पादत्राणांवरील जीएसटी ५ टक्क्यांवरून १२ टक्के वाढविण्याची अधिसूचना सरकारने जारी केली आहे. त्यामुळे एक हजार रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेली पादत्राणेही महाग होणार आहेत.