जिमी शेरगिल टीव्हीवर करणार डेब्यू?

फिल्मी पडद्यावर आपल्या ॲक्टिंगचा जलवा दाखवल्यानंतर आता अभिनेता जिमी शेरगिल टीव्ही जगतात एंट्री करणार आहे. मात्र तो कोणत्या शोचे होस्टींग करणार नाहीयं, तर एका फिक्शन शोमध्ये तो मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, उडारियां शोचे मेकर्स म्हणजे सरगुन मेहता आणि रवि दुबे लवकरच आपला नवा शो घेऊन येत आहेत. या शोकरिता त्यांनी जिमी शेरगिलला अप्रोच केले आहे. हा शो एक फॅमिली ड्रामा असेल. शोचे टायटल स्वर्ण मंदिर आहे. या शोची कथा एका अशा दाम्पत्याभोवती फिरते ज्यांच्या मुलांनी त्यांना सोडलेले असते. या शोसंदर्भात जिमी बरोबर सुरू असलेली चर्चा ॲडव्हान्स स्टेजमध्ये आहे. खरेतर त्याने अद्याप कोणतेही कॉन्ट्रॅक्ट साइन केलेले नाही, परंतु लवकरच तो या शोचे कॉन्ट्रॅक्ट साइन करेल अशी अपेक्षा आहे. या शोचे शूटिंग पुढील महिन्यापासून चंदिगडमध्ये सुरू होणार आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …